घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील जनतेची माफी मागा

महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाना पटोलेंचा इशारा

देशात कोरोना संक्रमण वाढण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना केला होता. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची तात्काळ माफी मागावी अन्यथा काँग्रेसकडून राज्यभर ‘मोदी माफी मांगो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी दिला.

नाना पटोले यांनी प्रत्त्युत्तर देताना भाजपवर घणाघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा, येथील जनतेचा अपमान केला आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक वर्षे दिशा दाखवली आहे. देशातील प्रत्येक राज्याला महाराष्ट्राने आपल्या परीने मदत केली आहे. गुजरातमधील भूकंपाच्या वेळेस महाराष्ट्राने भरीव मदत केली होती. धीरुबाई अंबानी, गौतम अदानी यांसारख्या उद्योजकांना मोठे करण्याचे श्रेय महाराष्ट्रालाच जाते. अनेक अभिनेते मुंबईत येऊनच घडले आहेत. देशातील प्रत्येक घटकाला मोठे करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे, असे असताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्राला अपमानीत करण्याचे काम केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. परंतु लोकसभा आणि राज्यसभेतील त्यांचे भाषण ऐकल्यावर ते अजूनही भाजपचे प्रचारक म्हणूनच वागत असल्याचे दिसत आहे. हे पंतप्रधानपदासाठी शोभनीय नाही. महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे. नाहीतर, बुधवारपासून महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते निषेधाचे फलक घेऊन ‘मोदी माफी मांगो’ आंदोलन करणार आहेत, असे नाना पटोले यांनी म्हटले.

तिन्ही पक्ष सुपर स्प्रेडर
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष सुपर स्प्रेडर आहेत.गरिबाला रस्त्यावर आणून त्याला अन्य राज्यात जाण्यास काँग्रेसने परावृत्त केले. काँग्रेस जर अंगावर येणार असेल, तर आम्हीही त्यांना शिंगावर घेण्यास तयार आहोत.
– आशिष शेलार, आमदार, भाजप

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -