घरताज्या घडामोडीमाझे वक्तव्य मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत, नाना पटोलेंचे मोदींना मारण्याच्या विधानावर स्पष्टीकरण

माझे वक्तव्य मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत, नाना पटोलेंचे मोदींना मारण्याच्या विधानावर स्पष्टीकरण

Subscribe

मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो अशा आशयाचे ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.

मी केलेलं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नाही तर स्थानिक मोदी नावाच्या गावगुंडाबाबत आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे नाना पटोले कार्यकर्त्यांना सांगत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. नाना पटोलेंच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र डागण्यात येत आहे. परंतु हा व्हिडीओ खोडसाळपणे व्हायरल करण्यात येत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमी पंतप्रधान नरेद्र मोदी आणि भाजपवर टीका करत असतात. पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या त्रृटीवरुनही पटोलेंनी खोचक टीका केली होती. तर आता भंडारा जिल्ह्यातील जेवनाळामधील प्रचार सभेनंतर नाना पटोले कार्यकर्त्यांशी संवाद साधता होते. यावेळी नाना पटोलेंनी मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे विधान केलं आहे. परंतु नाना पटोले यांनी हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलं नाही असे स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्वीट करत त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो अशा आशयाचे ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.

- Advertisement -

नाना पटोले काय म्हणाले ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये संवाद साधताना असे म्हणाले की, “मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे”


हेही वाचा : …म्हणून मी मोदींना मारू शकतो, नाना पटोलेंच्या वादग्रस्त विधानानं खळबळ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -