घरभक्तीVastu Tips:घरात या दिशेला चुकूनही लावू नका कॅलेंडर

Vastu Tips:घरात या दिशेला चुकूनही लावू नका कॅलेंडर

Subscribe

नवीन वर्ष २०२२ सुरू झाले असून वर्ष बदलले की आपण घरातले जुने कॅलेंडर काढून नव्या वर्षाचं कॅलेंडर लावतो.
पण जर तुम्ही वास्तु शास्त्रानुसार चुकीच्या दिशेला हे कॅलेंडर लावले तर तुम्हाला वर्षभर नाहक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावल्याने तुमची प्रगतीही खुंटू शकते.

तसेच वास्तु शास्त्रानुसार नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर घरात जुन्या अडगळ निर्माण करणाऱ्या वस्तू ताबडतोब काढून टाकाव्यात. जुने कॅलेंडरही काढून टाकावे. त्यामुळे जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षात प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. प्रगतीचे मार्ग खुले होतील.नवीन कामासाठी आवश्यक असलेली उर्जा निर्माण होईल. यामुळे जुने कॅलेंडर ताबडतोब टाकून द्यावे.

- Advertisement -

घराच्या उत्तर, पश्चिम, पूर्व भिंतीवर कॅलेंडर लावणे योग्य आहे. हल्ली बरेच कॅलेंडर हे थीमवर असतात. त्यामुळे कॅलेंडरच्या पानांवर कधी बीभत्स प्राण्यांची हिंसक चित्र असतात. तर कधी दुखी त्रासात असलेल्या महिलाचे पेंटींग लावले जाते. याचा वास्तूवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे नैराश्य भीची चिंता निर्माण करणारे चित्र किंवा वॉल पेपर घरात ठेऊ नयेत. तसेच जर तुम्ही पूर्व दिशेला कॅलेंडर लावले असेल तर ते शुभ मानले जाते. कारण या दिशेचा स्वामी सूर्य़ देव आहे. यामुळे जर कॅलेंडरवर उगवत्या सूर्याचे चित्र असेल तर ते शुभ मानले जाते.

कॅलेंडर लावताना काय काळजी घ्याल
घरात कॅलेंडर लावताना ते कधीही दक्षिण दिशेला लावू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्यास घरात सुख समृध्दीचा अभाव निर्माण होतो.

- Advertisement -

मनाला आणि डोळ्याला शांतता देणारे चित्र असलेले कॅलेंडर लावावे.

अनेकजण घराच्या दरवाजामागे कॅलेंडर लावतात. तसे केल्याने घरात आजारपण येते. आयुष्यही कमी होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -