घरताज्या घडामोडी'Corona' चा लवकरच अंत होणार; अमेरिकी शास्त्रज्ञांनी बुद्धिबळाचे उदाहरण देत केला दावा

‘Corona’ चा लवकरच अंत होणार; अमेरिकी शास्त्रज्ञांनी बुद्धिबळाचे उदाहरण देत केला दावा

Subscribe

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच आता अमेरिकी शास्त्रज्ञांनी एक दावा केला आहे. त्यांनी या कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांना दिलासा देणारा एक दावा केला आहे. नुकतेच वॉशिंग्टनचे शास्त्रज्ञ आणि वायरोलॉजिस्ट डॉ. कुतुब महमूद म्हणाले की, ही महामारी कायमची राहू शकत नाही आणि तिचा अंत अगदी जवळ आला आहे.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या गर्तेत अडकले आहे. त्यातच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट डोके वर काढत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच आता अमेरिकी शास्त्रज्ञांनी एक दावा केला आहे. त्यांनी या कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांना दिलासा देणारा एक दावा केला आहे. नुकतेच वॉशिंग्टनचे शास्त्रज्ञ आणि वायरोलॉजिस्ट डॉ. कुतुब महमूद म्हणाले की, ही महामारी कायमची राहू शकत नाही आणि तिचा अंत अगदी जवळ आला आहे. बुद्धिबळाच्या या खेळात कोणीही विजेता नसतो. हा खेळ एका ड्रॉ मॅचप्रमाणे आहे. ज्यामध्ये व्हायरस लपून जाईल आणि लवकरच नागरिकांची फेसमास्कमधून मुक्तता होणार आहे, असा दावा डॉ. कुतुब महमूद यांनी केला आहे.

भारतात कोरोना विरोधी मोहिमेची वर्षपूर्ती

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लढा देण्यासाठी भारतात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे आजचा दिवस भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोरोना लसीकरणाला संपूर्ण भारतभर सुरुवात झाली. आज या कोरोना विरोधी लसीकरणाला वर्षपूर्ती झाली असून, भारतात आतापर्यंत 157 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र,देशातील एकूण एक नागरिकांना लसीचा डोस देण्याचे लक्ष्य आहे.

- Advertisement -

भारताच्या लसीकरण मोहिमेला वर्षपूर्ती झाली असून, त्यावर डॉ.कुतुब म्हणाले की, लस हे कोरोनाशी लढण्यासाठी सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. ते म्हणाले, आमच्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटीबॉडीज सारखी शस्त्रे आहेत या शस्त्राचा वापर आम्ही कोरोनाच्या महामारीवर मात करत आहेत. या काळात लसीकरणाशिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.  हात धुणे,सामाजिक अंतर बाळगणे,मास्क लावणे या त्रिसुत्री नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांचे लसीकरण झाले तर येणाऱ्या कोणत्याही भयानक आजारावर तुम्ही मात करु शकता. डॉ. कुतुब यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे कौतुक करताना सांगितले की, हे एक चांगले देशांतर्गत उत्पादन आहे.


हेही वाचा – भारताची mRNA लस जिंकणार ओमिक्रॉन विरोधातील युद्ध? सरकार लवकरच निर्णय घेणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -