घरमहाराष्ट्रभाजपमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले - नाना पटोले

भाजपमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले – नाना पटोले

Subscribe

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील इतर मागास वर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण गेले, हे पाप भारतीय जनता पक्षाचेच आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

विधानसभेत आज ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले त्याची सुरुवात २०१७ साली झाली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचेच सरकार होते. ओबीसींचे आरक्षण धोक्यात जाण्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली त्याचे पाप भाजपाचेच आहे. हा प्रवास २०१७ सालापासून सुरु झाला आहे. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे आहे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. २०१८ साली हाय कोर्टाने सांगितले होते की आयोग बसवा परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले.

- Advertisement -

मुस्लिम आरक्षणासाठी विधानसभेत घोषणाबाजी

राज्यातील मुस्लिमसमाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्य्च्या मागणीसाठी गुरुवारी विधासभेत घोषणाबाजी झाली. मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे अबू असिम आझमी आक्रमक झाले  होते.त्यांनी सभाग़हात या मागणीचे बॅनरही फडकावले.
भाजप सरकारने पाच वर्षे मुस्लिमांना आरक्षण दिले नाही.आता महाविकास आघाडी हे आमचे सरकार आले आहे.मुस्लिमांना आरक्षण देउ असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले होते.मग आरक्षण कधी देणार? असा सवाल अबू आझमी यांनी केला.

तर केंद्र सरकारने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढविण्यासाठी घटनादुरूस्ती करून राज्यांना अधिकार दयावेत.तसे झाल्यास ओबीसी,मराठा,मुस्लिम हे सर्व आरक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील,  असे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले. आरक्षणाची मर्यादा  ५० टक्क्यांची  आहे.केंद्र सरकारने घटनादुरूस्ती करून ती मर्यादा वाढविली पाहिजे आणि  आरक्षणाचे अधिकार राज्यांना दिले पाहिजेत, अशी मागणीही मलिक यांनी केली.

- Advertisement -

दरम्यान, मुस्लिम आरक्षणच्या मागणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.आम्ही लहानपणी गोष्ट ऐकली आहे की राजाचा पोपट मेला हे कोणी सांगायचे.आता देखील तसेच झाले आहे.आम्ही जेव्हा सांगत होतो की मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही, तेव्हा आताचे सत्ताधारी आंदोलने करत होते.आता ते वेगळी भाषा बोलत आहेत.मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा कायम विरोधच राहिले, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेत शक्ती विधेयक एकमतानं मंजूर


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -