घरताज्या घडामोडीशिवसेना प्रवेशासाठी पालकमंत्री निधी देतात? सिंधुदूर्ग नियोजन समिती सभेत राणेंचा सवाल

शिवसेना प्रवेशासाठी पालकमंत्री निधी देतात? सिंधुदूर्ग नियोजन समिती सभेत राणेंचा सवाल

Subscribe

शिवसेना प्रवेशासाठी पालकमंत्री निधी देतात हे खरे आहे का ? या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रश्नाने नियोजन समिती सभेत मोठा गदारोळ झाला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिल्यानंतर शिवसेना सदस्यांनी बाके वाजवत दाद दिली यावर खासदार राणे यांनी यात बाके वाजवण्यासारखे काय आहे ? एकेक प्रकरणे बाहेर काढून तुमची पळता भुई थोडी करेन असा थेट इशारा दिला. यानंतर भाजप सदस्यांनी देखील बाके वाजवली.यावर काही काळ सभागृहात गदारोळ झाला होता.

या विषयावर झाला सभागृहात जोरदार गोंधळ

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री उदय सामंत यांनी नियोजन समितीचा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्याना देतात असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला यावेळी सभागृहात गदारोळ झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर नियोजन चा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना परस्पर देण्यात येत असल्याचा आरोप केला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाला. खासदार राणें यानी पेपर मध्ये आलेली बातमी चा पुरावा देत हा आरोप केला. यावेळी आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अध्यक्ष उदय सामंत यांनी सेनेच्या सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं.व नियोजनाचा निधी कुठे ही परस्पर नियोजन समितीच्या सभेस शिवाय दिला जात नसल्याच सांगितले. मात्र पेपर मधील बातमी ही शिवसेनेच्या मेळाव्यात बोललो तेव्हाची होती. मात्र असा उल्लेख मी कुठे केला नसल्याचं उदय सामंत यांनी सांगत वादावर पडदा टाकला.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ, बुडवणाऱ्यानी हे आम्हाला शिकवू नये असा टोला शिवसनेचे नियोजनचे सदस्य संदेश पारकरांना लगावला तर नितेश राणेंनी तुम्हाला लोकांनी नाकारलं आणि तुम्ही लोकांना फसवलं त्याची लिस्ट आम्ही काढू अस म्हटले यावेळी सभागृहात गोधळ निर्माण झाला. सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम प्रतीभा कृषी प्रक्रिया लिमिटेड कोडोली या संस्थेने दुधापोटी येणे असलेली बाकी रक्कम २ कोटी ७७ लाख रुपये गेले चार वर्षे देण्यास टाळाटाळ करून येथील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मुद्दा समोर आला यावेळी सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीतुन मुक्तता मिळावी म्हणून नियोजन समितीत मुद्दा उपस्थित करण्यात आला.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभागृहात ज्यांच्यावर आरोप केला जातो त्यांची नाव घ्यावीत आम्ही जबाबदारी घेऊ असं म्हटलं तर पैसे बुडवणाऱ्यानी हे आरोप करू नयेत असाही आरोप शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य असलेले संदेश पारकरांना टोला लगावला तेव्हा पारकरांनी हा सदस्यांचा अपमान असल्याचं म्हटलं यावेळी आमदार नितेश राणे यांनी तुम्ही लोकांना लूटल्याची लिस्ट देऊ म्हणून तर कणकवलीतील लोकांनी पाडलं असा टोला संदेश पारकर यांना लगावला.

- Advertisement -

वागदे,ओसरगाव येथील विकासकामे कुडळाचे आमदार आणि पालकमंत्र्यांनीच रोखली – नितेश राणे

कुडाळ मालवणचे आमदार वागदे ओसरगाव मध्ये सुचविली कामे थांबवतात.हे योग्य आहे काय.पालकमंत्री त्या पत्राला स्वतःचे पत्र जोडून काम थांबवा असे आदेश दिले.नेहमी इतर कामासाठी पालकमंत्री तुम्ही फोन करता तसा फोन करून जरी मला विचारले असते तर तुम्हाला सांगितले असते.आता त्या दोन गावातील लोक गेटवर येऊन आंदोलन करत आहेत. त्यांना तुम्हीच उत्तर द्या..!आणि कुडळाचे आमदार वैभव नाईक यांनी अशी पत्रे देणे थांबवावीत आणि आपल्या मतदारसंघात जी कामे प्रलंबित आहेत ती पहावी. असा सल्ला नितेश राणे यानी दिला

नियोजन समितीच्या सभेला सुरवातीलाच झाला गोंधळ सुरु

केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी सभेच्या सुरुवातीपासूनच गोंधळाला सुरुवात झाली होती.


हेही वाचा –  आमदार झिशान सिद्धिकी आणि भाई जगताप यांच्या वादावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -