घरताज्या घडामोडीप्रकरणं बाहेर काढताय?, मग 'त्या' हत्या करायला कुणी सांगितल्या याचीही चौकशी करा...

प्रकरणं बाहेर काढताय?, मग ‘त्या’ हत्या करायला कुणी सांगितल्या याचीही चौकशी करा – राणेंचा गौप्यस्फोट

Subscribe

मी बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की, ठाकरे कुटुंबियांना त्रास देणार नाही.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पुन्हा शिवसेनेवर टीका केली आहे. माझी प्रकरण बाहेर काढत आहेत. मग त्या हत्या करायला कुणी सांगितल्या याची देखील चौकशी करा असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. मी ठाकरे कुटुंबियांना त्रास देणार नाही असा शब्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता. परंतु सध्या ज्या घटना घडत आहेत त्यामुळे मला बोलावं लागत आहे. माझी इच्छा नसताना मला बोलावं लागत आहे यामुळे शिवसेनेनं हे थांबवावे असे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. तसेच पुन्हा माझ्या घराच्या दिशेने याल तर सोडणार नाही असा इशाराही नारायण राणे यांनी शिवसेनाला दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये जन आशीर्वाद यात्रेदरम्यान एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. तसेच शिवसेनेनं हे सगळे थांबवावे माझी बोलायची इच्छा नसल्याचेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, माझ्यावर आरोप होत असतील तर त्यांचेही हात दगडाखाली आहेत. वेळ येईल तेव्हा एक एक करुन प्रकरणं बाहेर काढेन. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या माध्यमातून सगळं करत आहेत. पण जर माझ्या कुटुंबावर कोणी आलं तर मी सोडणार नाही असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

माझ्यावर टीका करत आहेत. माझी प्रकरणं बाहेर काढायची आहे तर काढा मग त्या हत्या करायला कुणी सांगितल्या याची चौकशी करा असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की, ठाकरे कुटुंबियांना त्रास देणार नाही. त्यांनी ज्या कारणामुळे माझ्याकडून शब्द घेतला होता ते सांगु शकत नाही. मात्र सध्या माझ्याविरोधात सुरु असलेल्या घटनांमुळे मला बोलावं लागत आहे. माझी हे करण्याची इच्छा नाही यामुळे शिवसेनेने सगळं थांबवावं, उद्धव ठाकरेंसोबत माझे वैयक्तिक वाईट काहीही नाही. असे नारायण राणेंनी म्हटलयं.

संजय राऊतांचे बोलवते धनी तपासा

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बोलवते धनी तपासले पाहिजेत. मी फार आक्रमक आहे. यापुर्वी उद्धवजी आणि आदित्य बाबत कधी बोललो नाही. परंतु आता बोलावं लागत आहे. आज जे आहे ते कर्तृत्वामुळे आहे. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ठाकरी भाषा होती. ते गेले तशी भाषाही संपली यामुळे आता जे बोलतात ती ठाकरी भाषा नाही. आता ती भाषा चालणारही नाही असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. खुनशी राजकारण कोण तरतंय हे तुम्ही बघा. महाराष्ट्रासाठी ते योग्य नाही. ईडी सीबीआयच्या रडारवर महाविकास आघाडी सरकारचे अनेक मंत्री असल्याचे नारायण राणेंनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भ्रष्टाचाराच्या पुराव्यानुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; क्लिनचिटवर CBI चं स्पष्टीकरण


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -