घरताज्या घडामोडीभ्रष्टाचाराच्या पुराव्यानुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; क्लिनचिटवर CBI चं स्पष्टीकरण

भ्रष्टाचाराच्या पुराव्यानुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; क्लिनचिटवर CBI चं स्पष्टीकरण

Subscribe

१०० कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या आरोपातून अनिल देशमुख यांनी क्लीनचिट देण्यात आली असल्याचा दाव करण्यात येत होता.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी सीबीआयनं क्लीनचिट दिली असल्याचा प्राथमिक अहवाल व्हायरल होत आहे. या अहवालावरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र या अहवालात तथ्य नसून सीबीआयनं खरं काय खोटं काय ते स्पष्ट करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली होती. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या नंतर आता सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याविरोधातील १०० कोटी रुपये भ्रष्टाचार प्रकरणी स्पष्टिकरण देण्यात आलं आहे. भ्रष्टाचाराच्या पुराव्यानुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरुच असल्याचे सीबीआयनं म्हटलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशी सुरु आहे. कोरोना काळात १०० कोटी रुपये बार आणि क्लबमधून जमा करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. मात्र सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १०० कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या आरोपातून अनिल देशमुख यांनी क्लीनचिट देण्यात आली असल्याचा दाव करण्यात येत होता. या दाव्यावर सीबीआयने म्हटलं आहे की अनिल देशमुख यांच्याविरोधात अजूनही कारवाई सुरु आहे.

- Advertisement -

सीबीआयने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की, भ्रष्टाचाराच्या पुराव्यांनुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी अद्यापही तपास सुरु असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे की, अनिल देशमुख १०० करोड भ्रष्टाचार प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी गैरप्रकारे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यता आला असून चौकशी सुरु करण्यची शिफारस करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतून कोरोना काळात बार आणि क्लबमधून १०० कोटी रुपये खंडणी जमा करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केले असून तसं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. या प्रकरणात हायकोर्टाच्या निर्देशानुसार सीबीआय चौकशी सुरु करण्यात आली आहे. सध्या अनिल देशमुख यांच्यावर आर्थिक गैरवव्यवहार प्रकरणी ईडीचीही चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अनिल देशमुखांबबतचा अहवाल खरा की खोटा सीबीआयनं स्पष्ट करावं, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

हेही वाचा :  १०० कोटी वसुली प्रकरण : अनिल देशमुखांना CBI कडून क्लिनचिट?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -