घरठाणेउद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी राजन विचारेंचा कट, नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंना खूश करण्यासाठी राजन विचारेंचा कट, नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Subscribe

सोमवारी रात्री ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. ठाकरे गटाच्या युवती रोशनी शिंदे यांना ठाण्यात शिंदे गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची महाआघाडी झाली आहे. ठाण्याच्या खासदारकीची जागा बदलणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीमध्ये झाला आहे. खासदार राजन विचारे यांना खासदारकीच्या जागेवरून बदलणार आणि त्याठिकाणी नवीन समीकरण करणार असा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी एक कट रचला, असा हल्लाबोल शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांच्यावर केला आहे.

नरेश म्हस्के यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी काहीतरी करणार आणि माझ्यामागे लोकं नाहीयेत. त्यामुळे त्यांनी एक बनाव केला. तसेच रोशनी शिंदे पवार या मुलीला पुढे करून तिच्या पदराआड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्यातील शिवसेना, भाजपचे सर्व पदाधिकारी यांच्याविरुद्ध फेसबुकद्वारे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. त्यानंतर तिला जेव्हा जाब विचारण्यात आला आणि धक्काबुक्की झाली. त्यानंतर राजन विचारे यांनी एक कट रचला. पदाधिकारी रोशनी शिंदे या प्रेग्नेंट महिलेला मारहाण करण्यात आल्याचा कट त्यांनी रचला. लोकांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंना खोटी माहिती पुरवत त्यांना ठाण्यात बोलून घेतलं, असं नरेश म्हस्के म्हणाले.

- Advertisement -

सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट समोर आल्यानंतरही राजन विचारे यांनी रोशनी शिंदेंना त्यांचे मित्र असलेले डॉ. उमेश आलेगावकर यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अॅडमिट केलं. त्यानंतर आलेगावकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर झालेलं नाहीये, असं आलेगावकर यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं, असं नरेश म्हस्के म्हणाले.

राज विचारे यांनी खोट्या पद्धतीने कट रचला होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून खोटा बनाव करण्यात आला होता. तो उघड झालेला आहे. त्यांनी आमची नाहक बदनामी केली आहे. लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं आहे. यामुळे आमची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्या लोकांवर कारवाई करावी. पोलीस प्रशासनाविरोधात त्यांनी संभ्रम निर्माण करत त्यांच्याविरोधात टीका केली आहे. काल कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर आज दिवसभर ठाण्यात गोंधळ घातला. त्यामुळे पोलीस प्रशासनाची सुद्धा बदनामी झालेली आहे. खोटे उद्धव ठाकरे हे आज लोकांसमोर आले आहेत. त्यामुळे तुम्ही यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : वाझेमागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय?, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -