घरमहाराष्ट्रनाशिकNashik Accident : नाशकात विद्यार्थ्यांच्या बस अन् ट्रकची धडक, अपघातात 15 ते...

Nashik Accident : नाशकात विद्यार्थ्यांच्या बस अन् ट्रकची धडक, अपघातात 15 ते 17 जण जखमी

Subscribe

औरंगाबाद रोडवर कॉलेजची बस सकाळी सात वाजताच्या सुमारास धामणगावकडे जात असताना सिग्नलवरच बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. कॉलेज बस रस्त्यावरच उलटली असून, अपघातात 15 ते 17 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळालीय.

नाशिकमध्ये आज सकाळी औरंगाबाद रोडवर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रस्त्यात उलटल्यानं झालेल्या अपघातात 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

औरंगाबाद रोडवर कॉलेजची बस सकाळी सात वाजताच्या सुमारास धामणगावकडे जात असताना सिग्नलवरच बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. कॉलेज बस रस्त्यावरच उलटली असून, अपघातात 15 ते 17 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळालीय. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळालीय. विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -