घरताज्या घडामोडीनाशकात शनिवारी पाणीपुरवठा बंद

नाशकात शनिवारी पाणीपुरवठा बंद

Subscribe

नाशिक महापालिकेच्या गंगापूर धरण वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा सर्व्हिसिंग कामांमुळे या केंद्रातून होणारा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी (दि.30) दुपारचा व सायंकाळचा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (दि.३१) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

नाशिक महापालिकेच्या गंगापूर धरण वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील वीजपुरवठा सर्व्हिसिंगसाठी शनिवारी (दि.30) सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीजपुरवठ्याअभावी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून पाणीपुरवठा पंपिंग केला जाणार नाही. त्यामुळे शनिवारी (दि.30) संपूर्ण नाशिक शहरातील दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसून रविवारी (दि.31) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -