घरताज्या घडामोडीNashik Oxygen Tank Gas leakage: नाशिक दुर्घटनेवर PM to CM, कोण काय...

Nashik Oxygen Tank Gas leakage: नाशिक दुर्घटनेवर PM to CM, कोण काय म्हणाले ?

Subscribe

सर्व नेत्यांनी नाशिक दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या

नाशिकमध्ये महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारी १२.३० च्या सुमारास रुग्णालयातील ऑक्सिजन टाकी लिकेज झाली, या टाकीतील ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयातील गंभीर असलेल्या रुग्णांना पुरवण्यात येत होता. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेले काही रुग्ण ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्यामुळे दगावले आहेत. याघटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ऑक्सिजन टॅंक लिकेज झाल्याने नाशिकमधील रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याने मन हेलावून गेले आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सामिल असल्याचे पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत नाशिक दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नाशिकमध्ये घडलेली घटना अत्यंत दुखद असून मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहे. तसेच राज्य सराकरने मृतांच्या कुटुंबीयांना मदत करावी असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन लिकेज दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शाह यांनी असे म्हटले आहे की, नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन लिकेज झाल्याची बातमी ऐकून व्यथित झालो. या दुर्घटनेत ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील होऊन संवेदना व्यक्त करतो. तसेच रुग्णालयातील इतर रुग्ण लवरकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ट्विट करत नाशिकमधील दुर्घटनेबाबत सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो. असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक दुर्घटनेबाबत सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत नाशिकमधील ऑक्सिजन टाकी लिकेज दुर्घटनेवर सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील ऑक्सिजन लिकेज होऊन रुग्णांचा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे. याबाब सखोल चौकशी होत राहील परंतु राज्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. आता रुग्णालयात जे पेशंट आहेत त्यांना योग्य उपचार मिळणं गरजेचे आहे. तसेत कोणत्या रुग्णांना शिफ्ट करायचे असल्यास त्यांना लवकर केले पाहिजे. तसेच अशी घटना पुन्हा घडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत तसेच त्यांच्यासाठी प्रार्थनाही करु असे विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील हृदयदावक घटना, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयातील दुर्घटनेत २२ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. काँग्रेस पक्ष मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -