घरमहाराष्ट्रनाशिकधुळ्यात ३ लाखांचा स्पिरीटचा साठा जप्त

धुळ्यात ३ लाखांचा स्पिरीटचा साठा जप्त

Subscribe

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बनावट मद्यनिर्मीतीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. शिरपूर (धुळे) तालूक्यातील अमोदे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल तीन लाखाचे स्पिरीट हस्तगत करण्यात आले असून ही कामगिरी विभागीय भरारी पथकाने केली.

शिरपूर तालूक्यातील अमोदे शिवारात बनावट मद्य निर्मीतीसाठी स्पिरीटचा बेकायदा साठा करून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाला मिळाली. त्यानुसार आयुक्त प्राजक्ता लवांगरे वर्मा, संचालक उषा वर्मा आणि विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. खबर्‍याने दिलेल्या माहितीच्या आधारे विभागीय भरारी पथकाने शुक्रवारी (दि.१९) शिरपूर नाक्याजवळील अमोदे शिवारातील संगिता रेसिडन्सी पार्क मागे छापा टाकला. तेथे २०० लिटर क्षमतेचे २८ प्लॅस्टीक बॅरल स्पिरीट आणि ४२ बॅरल रिकामे आढळून आले. पथकाने २ लाख ७३ हजार रूपये किमतीचा बनावट मद्य निर्मितीच्या उद्देशाने ठेवलेला साठा हस्तगत केला. या प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही कारवाई प्रभारी निरीक्षक देवदत्त पोटे,दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, ए. व्ही. सुत्रावे, एम. पी. पवार, जवान दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, एस. एल. गायकवाड, एम. यु. अहिरे, शांतीलाल देवरे, वाहनचालक जी. डी. शिंदे यांनी केली. पुढील तपास निरीक्षक रावते करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -