घरताज्या घडामोडीविभागातील 17 हजार कर्मचार्‍यांना करोना प्रशिक्षण

विभागातील 17 हजार कर्मचार्‍यांना करोना प्रशिक्षण

Subscribe

नाशिक : भारत सरकाराच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत नाशिक विभागातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा तसेच सर्व पर्यवेक्षक संवगार्तील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांना व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे प्रशिक्षण देण्यात आले. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातील 16 हजार 888 कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली.
करोना विरोधात लढयामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. दि. 8 ते 11 एप्रिल या कालावधीत तेरा सत्रांमध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आहे तेथेच कर्मचाजयांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये कोरोना आजार म्हणजे काय? त्याची लक्षणे, त्याचा प्रसार कसा होतो, कार्यक्षेत्रात काम करताना नागरिकांची संवाद कशा प्रकारे करावा. नागरिकांनी काय काळजी घ्यावी? सामुदायिक छाननी कशा पध्दतीने करावी, ती करीत असताना कोणती काळजी घ्यावी ,सहवासीतांची तपासणी व त्यांचा मागोवा , घरी विलगीकरण केलेल्या व्यक्तींची काळजी कशी घ्यावी, तसेच याबाबत असलेले समज-गैरसमज विलगीकरण केलेल्या व्यक्तींची मानहानी होणार नाही याबाबत माहिती दिली. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोविंद चौधरी, डॉ. किरण बकरे, डॉ. अनिल सोनवणे व अर्चना जोशी यांनी कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण दिले.
..
जिल्हानिहाय कर्मचारी
नाशिक- 5063
धुळे- 2037
जळगाव-3861
अहमदनगर-4475
नंदुरबार-1452
एकूण- 16 हजार 888

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -