घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरोड कारागृहातून ३५० कैद्यांना पॅरोलवर सोडले

नाशिकरोड कारागृहातून ३५० कैद्यांना पॅरोलवर सोडले

Subscribe

कच्च्या कैद्यांचीही होणार सुटका : अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली माहिती

करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील कारागृहातून ३५० कैद्यांची  पॅरोल व जामीनावर तात्पुरती सुटका करण्यात आली असून अजूनही सुमारे चारशे कच्च्या कैद्यांना सोडण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

राज्यातील कारागृहात करोनाची लागण होऊ नये व गर्दी कमी करण्यासाठी  सतरा हजार कैद्यांना सोडण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलेले आहेत, त्या आदेशाप्रमाणे नाशिकरोड येथील कारागृहातून  शनिवार(दि.१६) पर्यंत ३५० कैद्यांना सोडण्यात आले, गेल्या सात दिवसांपासून रोज पन्नास कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्या राहत्या पत्यावर सुरक्षित सोडण्यात आले आहे. ज्या कैदाला सात वर्षे किंवा त्यापेक्षा कमी पर्यंत शिक्षा झालेली आहे अशा कैद्यांना पॅरोल व जामीनावर सोडण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने एक महिन्यापुर्वीच दिले होते, त्या आदेशाचे पालन करत कैद्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर न्यायालयाचे आदेश आल्यानंतर अजूनही सुमारे चारशे कच्च्या कैद्यांना सोडण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

रोज फक्त ५० कैदी सोङणार

कैद्यांना एसटी बस किंवा विशेष गाडीतून घरी सोडले जात आहे. घरापर्यंत संरक्षितरित्या सोडण्याची जबाबदारी न्यायालयाने प्रशासनावर दिलेली असल्याने रोज फक्त ५० कैदी सोडण्यात आले असल्याचे अधीक्षक वाघ यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -