घरताज्या घडामोडीगोळीबार प्रकरणी पाच पोलीस निलंबित

गोळीबार प्रकरणी पाच पोलीस निलंबित

Subscribe

दोन दिवसांपुर्वी तडीपार गुंडाकडून झालेल्या गोळीबार प्रकरणी आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील पाच पोलीसांना निलंबित केल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

दोन दिवासांपुर्वी देवळाली कॅम्प भागातील हाडोळा येथे राहणा-या यश पवार याच्यावर सनी कदम याने गोळीबार केला होता, त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच प्रमाणे त्याचा भाऊ शामलीन पवार याच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले होते. शहरातून हद्दपार केलेल्या गुंडांकडून गोळीबार केला गेल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत सबंधीत दोषी पोलीसांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी देवळाली पोलीस ठाण्यात भेट देऊन संशयित सनी कदम बाबत माहिती असलेले पोलीस कर्मचारी यांची माहिती घेतली. यात दोन पोलीस हवालदार व तीन पोलीस शिपाई यांनी कर्तव्य करण्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर रात्री उशीरा कारवाई करण्यात आल्याचे कळते. याबाबत पोलीस उपायुक्त विजय खरात यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

गोळीबार प्रकरणी दोन पोलीस हवालदार व तीन पोलीस शिपाई यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

विजय खरात, पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -