घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रइगतपुरीतील ५० सरपंचांनी राळेगणसिद्धी, हिवरे बाजार येथे घेतले ग्रामविकासाचे धडे

इगतपुरीतील ५० सरपंचांनी राळेगणसिद्धी, हिवरे बाजार येथे घेतले ग्रामविकासाचे धडे

Subscribe

इगतपुरी : तालुक्यात समृद्ध ग्रामविकास साधण्यासाठी सक्षम सरपंचांची भक्कम फौज कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके नेहमीच पुढे असतात. यासाठी त्यांनी स्वखर्चाने अभिनव अभ्यासदौरा आयोजित करून इगतपुरी तालुक्याच्या कानाकोपर्‍यातील जवळपास ५० सरपंचांना अभ्यास दौर्‍यात सहभागी करून घेतले.

विकासासाठी रात्रंदिवस सूक्ष्मपणे काम करून राज्यासमोर आदर्श घडवलेल्या विकासाचा आलेख त्यांना दाखवण्यात आला. हिवरेबाजार, राळेगणसिद्धी गावांचा झालेला शाश्वत विकास पाहून आपल्याही गावाला विकसित करण्याचा दृढ संकल्प सर्व सरपंचांनी केला. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनीही इगतपुरी तालुक्यात केलेला अभूतपूर्व विकास नजरेसमोर ठेवून विकासाची फळे गावाला देण्यासाठी जीवाचे रान करू असा निश्चय यावेळी करण्यात आला. बोडके यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली येणार्‍या काळात ग्रामविकास साध्य केला जाणार आहे. समृद्ध ग्रामविकासाठी सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायतींच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचा शब्द यावेळी बोडके यांनी सर्वांना दिला.

- Advertisement -

घोटी येथून अभ्यासदौर्‍याचा प्रवास सुरु झाला. प्रवासावेळी प्रत्येक सरपंचाने आपली सर्वांना ओळख करून दिली. यानंतर प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करून आपल्या गावाला कोणती विकासकामे आवश्यक आहेत याबाबत माहिती दिली. यासह गाव पुढे नेण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी प्रत्येक सरपंचाने व्यक्त केलेल्या भावनांची स्वतंत्र नोंद घेऊन याप्रमाणे कृतिशील विकासासाठी सोबत राहून मोठे काम उभे करूया असे सांगितले. दुपारी आदर्श गाव राळेगण सिद्धी येथे भेट देऊन तेथील प्रभावी विकासाची पाहणी केली. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सर्व सरपंचांना मार्गदर्शन करतांना विकासाची विविध सूत्रे उलगडून सांगितली. महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सरपंचांची भूमिका त्यांनी सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगितली. बोडके यांनी इगतपुरी तालुक्याच्या वतीने समाजसेवक अण्णा हजारे यांचे आभार मानले. पुढील सत्रात पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांची भेट घेण्यात आली. आमदार लंके यांनी सर्व सरपंचांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले. बोडके यांनी लंके यांच्या कार्याची प्रेरणा इगतपुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी घेतील असे त्यांना सांगितले.

अभ्यास दौर्‍याच्या शेवटी आदर्श गाव हिवरे बाजार येथील शाश्वत विकासाची सरपंचांनी सूक्ष्म पाहणी केली. सरपंच पोपटराव पवार यांनी सर्वांना विकासाची नांदी निर्माण करण्यासाठी सूत्रबद्ध माहिती दिली. आमच्याही गावात असा विकास करण्याचा आम्ही निर्धार करीत असल्याचे यावेळी सर्वांनी मत व्यक्त केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी मंत्री छगन भुजबळ, नांदगावचे आमदार सुहास कांदे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विभागाच्या अधिकारी लीना बनसोड, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना सरपंच दौर्‍याची माहिती समजली. त्यांनी दूरध्वनीवरून आपल्या शुभेच्छा सर्वाना देऊन ह्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -