घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'कोणता बी पदवर रहा पण अहिराणीना अभिमान बाळगा' : प्राचार्य प्रशांत पाटील

‘कोणता बी पदवर रहा पण अहिराणीना अभिमान बाळगा’ : प्राचार्य प्रशांत पाटील

Subscribe

मालेगाव : आपल्या बोलीभाषेचा न्यूनगंड कधीही बाळगू नका. परदेशात असलेल्या आपल्या अहिराणी भाषिकांना सातत्याने गौरव वाटतो. आपण कुठल्याही पदावर असलो तरी सदैव भाषाविषयक अभिमान ठेवावा, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले. उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे पासबान हॉल, मालेगाव येथे आयोजित बहुभाषिक कवी संमेलनात ते बोलत होते.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मंचावर अध्यक्ष विकास पाटील, महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष धर्मा भामरे, कवी संमेलनाचे अध्यक्ष गझलकार सुरेंद्र टिपरे, स्वागताध्यक्ष शफिक शेख, संयोजक डॉ. एस. के. पाटील, भिला महाजन, रविराज सोनार, वाय. के. खैरनार आदी उपस्थित होते. प्राचार्य पाटील पुढे म्हणाले की, आपण भाषा संवर्धनापलीकडे आपल्या खान्देश भागातील अहिराणी महिला भगिणींना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विविध रोजगार, उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. जानेवारीत नाशिक येथे तिसरे विश्व अहिराणी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

सुरेश निकम म्हणाले की, आजही मित्र परिवारात, ग्रामीण भागात अहिराणी बोलत असतो. जगातील ३५ देशांत अहिराणी भाषिक वास्तव्य करतात. विश्व अहिराणी संमेलनाने मोठा गजर झाला. राज्य सरकारकडे अहिराणी भाषेसंदर्भात पाठपुरावा करून संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे सांगितले. मप्रास्ताविक डॉ. एस. के. पाटील यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत शब्बीर शेख यांनी केले. सूत्रसंचालन तुषार शिल्लक यांनी केले. दुसर्‍या सत्रात कवी अब्दुल रशीद, मुस्तफा बरकती, हाफिज अन्सारी, हंसराज देसाई, संतोष कांबळे, सुनील वाघ यांनी हिंदी व उर्दूतून तर राजू पवार, देवदत्त बोरसे, विवेक पाटील, धनंजय पवार, कैलास भामरे, अजय बिरारी, सोमदत्त मुंजवाडकर, चंद्रकांत ठाकरे, विवेक पाटील, माधुरी अमृतकर यांनी अहिराणी भाषेतून भिला महाजन, रवीराज सोनार, मनिषा सावळे, सुनिता पाटील, दीपक चव्हाण, राजेंद्र दिघे, श्रीराम मोरे, संगिता पगारे, यश सोनार, आबा आहेर, अपर्णा येवलकर, छाया देसले, समिना कुरेशी, उषाश्री बागडे, किरण देवरे यांनी मराठीतून कविता सादर केल्या. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन तुषार शिल्लक व राजेंद्र दिघे यांनी केले. आभार विवेक पाटील यांनी मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -