घरताज्या घडामोडीमोबाईल, दुचाकीसाठी मैत्रिणीने नातेवाईकांच्या घरी केली ६.४० लाखांची चोरी

मोबाईल, दुचाकीसाठी मैत्रिणीने नातेवाईकांच्या घरी केली ६.४० लाखांची चोरी

Subscribe

अवघ्या दोन तासात पोलिसांनी केले मित्रास अटक

मित्राला मोबाईल व दुचाकी खरेदी करता येण्यासाठी मैत्रिणींने वाढदिवसानिमित्त नातेवाईकांच्या घरी येत ६ लाख ४० हजार रूपयांच्या दागिने व रोकडवर डल्ला मारला. ही घटना रविवारी (दि.१४) जनरल वैद्यनगर, पाटीदार भवनजवळ घडली. दागिने चोरी झाल्याचे समजताच नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू करत अवघ्या दोन तासात मुद्देमालासह आरोपीस अटक केली. दीप धनंजय भालेराव (२०) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

घरातून दागिने, रोकड लंपास झाल्याप्रकरणी तक्रारदाराने रविवारी (दि.१४) मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने रविवारी वाढदिवसानिमित्त नातेवाईकांकडे घरी बोलवले होते. त्यानुसार तक्रारदाराची नणंद व १५ वर्षीय नात त्यांच्या घरी आले. तिनेच चोरी केली असावी, असा त्यांना होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी १५ वर्षीय मुलीकडे चौकशी केली असता तिने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला नातेवाईकांच्या मदतीने विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मित्रास मोबाईल व दुचाकी खरेदी करण्यासाठी पैशांची गरज होती. त्याने तिच्याकडे पैशांची केली होती. वाढदिवसात तक्रारदाराच्या घरी चोरी करण्याचे तिने ठरविले. वाढदिवस झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी व तिच्या आजीने रात्री नातेवाईकाच्या घरी मुक्काम केला. दरम्यान, मुलीने तक्रारदाराच्या घरातून दागिने व रोकड चोरी केली. दुसर्‍या दिवशी सकाळी ९.४५ वाजता तिने मित्र दीप भालेराव यास तक्रारदाराच्या घराजवळ बोलवून घेतले. तो येताच तिने त्याच्याकडे दागिने व रोकड दिली. त्यानंतर सोमवारी (दि.१५) दुपारी २.३० वाजता मुलगी व आजी शालिमार येथील घरी परत आले.

- Advertisement -

पोलीस संशयित आरोपी भालेराव याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तो घरीच सापडला. पोलिसांनी त्याला दागिने व रोकडबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने, चांदी व रोकड असे एकूण ६ लाख ४० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, पोलिसांनी विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -