घरताज्या घडामोडी77 वाहनचालकांकडून 30 हजार दंड वसूल

77 वाहनचालकांकडून 30 हजार दंड वसूल

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे. रस्त्यावर येवून वाहतूक आदेश व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 77 जणांवर गुरुवारी (दि.26) शहर वाहतूक शाखेने कारवाई करत त्यांच्याकडून 29 पाचशे दंड वसूल केला आहे.

करोना आजार आटोक्यात यावा, यासाठी शहर पोलिसांचा चौकाचौकात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर अनावश्यक कारणासाठी येऊ नये, असे आवाहन केलेले असतानाही 77 जणांनी वाहनांसह रस्त्यावर येवून आदेशाचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. त्या सर्वांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून 29 हजार 500 रुपये दंड वसूल केला. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी रस्त्यावर येण्यापूर्वी वाहनचालकांनी वाहनासंबंधित सर्व कागदपत्रे सोबत बाळगावी, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -