घरक्राइमफसवणूकप्रकरणी नरेश कारडावर गुन्हा दाखल

फसवणूकप्रकरणी नरेश कारडावर गुन्हा दाखल

Subscribe

बांधकाम पूर्ण न करता आणि मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता ग्राहकांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांच्यासह कंपनीच्या भागीदारांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत नरेश कारडांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात तीन, मुंबई नाका पोलीस ठाणे व नाशिकरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार व फिर्यादी विनोद विजय गाडेकर (रा. विपुल सिद्धी – निवास, जुना चेहेडी रोड, नाशिकरोड) व इतर फ्लॅट खरेदीधारकांनी कारडा न कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश – जुगमल कारडा (वय ४६, रा. साईकृपा कॉम्प्लेक्स, टिळक रोड, नाशिकरोड) व प्रवीण मुरलीधर जगताप (वय ४०, रा. सायट्रिक, पंचक, जेलरोड) यांच्या कारडा कन्स्ट्रक्शन्सतर्फे सुरू असलेल्या खर्जुल मळा येथे हरी संस्कृती या इमारतीत फ्लॅट्सची बुकिंग केली होती; मात्र आरोपी नरेश कारडा व प्रवीण जगताप यांनी संगनमत करून फिर्यादी गाडेकर व इतर फ्लॅट खरेदी धारकांकडून फ्लॅट ताब्यात देण्याचे आश्वासन दिले; मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता, तसेच मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता फ्लॅट खरेदीधारकांकडून फ्लॅट ताब्यात देण्याचे आश्वासन दिले. मात्र, इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता खरेदीदारांकडून वेळोवेळी १ कोटी २५ लाख २७ हजार ८१ रुपयांची रक्कम घेऊन विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार २०१९ ते ११ एप्रिल २०२४ या कालावधीत घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित नरेश कारडा व प्रवीण जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -