घरक्राइम४ कोटींसाठी भागवत बंधूंचे अपहरण

४ कोटींसाठी भागवत बंधूंचे अपहरण

Subscribe

येवला पंचायत समिती माजी उपसभापती व शिवसेनेचे उबाठा गटाचे पदाधिकारी रुपचंद भागवत व त्यांचे भाऊ विष्णू भागवत यांचे चार कोटी रुपयांसाठी नाशिक शहरातील सीबीएस परिसरातून बुधवारी (दि.२८) अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांना दुसर्‍या दिवशी गुरुवारी अहमदनगरमध्ये सोडून दिले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.२९) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, रुपचंद भागवत हे कामानिमित्त बुधवारी (दि.२८) जिल्हा न्यायालयात आले होते. ते सायंकाळी ७ वाजता सीबीएस परिसरात कार पार्क केलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी अचानक काहीजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी बळजबरीने भागवत यांना दुसर्‍या कारमध्ये बसविले. त्यानंतर कारमधून काहीजणांनी भागवत यांचे अपहरण केले. ही बाब सीबीएस परिसरातील भागवतांच्या ओळखीच्या व्यक्तींना समजली. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी भागवत यांचा शोध घेतला असता अपहरणकर्ते नाशिक सोडून गेल्याचे समोर आले. गुरुवारी पुन्हा पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता भागवत यांना अपहरणकर्त्यांनी अहमदनगरमध्ये सोडून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भागवतांच्या नातलगांनी धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -