घरउत्तर महाराष्ट्रप्रेमसंबंध तुटल्याने प्रेयसीने केले प्रियकराचे अन् त्याच्या बहिणीचे मॉर्फ केले फोटो व्हायरल

प्रेमसंबंध तुटल्याने प्रेयसीने केले प्रियकराचे अन् त्याच्या बहिणीचे मॉर्फ केले फोटो व्हायरल

Subscribe

नाशिक शहरात एका प्रेयसीने मनात राग धरुन प्रियकराचे व त्याच्या बहिणीचे फोटो मॉर्फ करत नातलगांत व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात प्रेयसीवर आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे कृत्य प्रेयसीनेच केले आहे का, या दृष्टीने सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन इन्स्टाग्रामकडून माहिती मागविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पीडित तरुणाच्या ६५ वर्षीय वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणाची बदनामी करुन संशयित प्रेयसीने फोटो मॉर्फ करुन ते व्हायरल केले. प्रेयसीच्या अशा कृत्यामुळे तरुणाचे लग्न दोनदा मोडल्याचा आरोप केला आहे. पीडित प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते पंचवटीतील घराजवळच राहतात. तरुण परराज्यात कामाला असून, दोघेही घराशेजारीच राहत असल्याने त्यांच्यात ओळख होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

- Advertisement -

सन २०२१ पासून त्यांचे रिलेशन जुळले. त्यातूनच प्रेम, भेटीगाठी सुरु असताना वितुष्ट निर्माण होऊन ‘ ब्रेकअप’ झाले. काही दिवस सर्वच सुरळीत असताना प्रेमसंबंध तुटल्याचा राग मनात धरुन प्रेयसीने बनावट मेल आयडीद्वारे व प्रियकराचे व्हॉट्सअप व फेसबुक प्रोफाईल बनविले. तर, मुलीच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट बनवून त्याद्वारे प्रोफाइलवर चॅटींग व विविध स्टेट्सद्वारे प्रियकराच्या बहिणीचा व इतर नातेवाइंकाचा एका कार्यक्रमातील ओरिजनल फोटोतील चेहरा क्रॉप करुन तो अश्लिल व नग्न तरुणीच्या फोटोशी मॉर्फ केला आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यामुळे एका या कुटूंबाची व नातेवाईकांची बदनामी झाली.

ब्रेकअपनंतर तरुणाच्या कुटुंबाने त्याच्या विवाहासाठी वधूचा शोध घेतला. दोघांची पसंती झाल्यावर लग्न ठरले. मात्र, संशयित तरुणीने केलेले उद्योग नियोजित वधूच्या कुटुंबास समजले. त्यामुळे त्याचा विवाह मोडला. दुसरी मुलगी पसंत केली असता तोही विवाह मोडला. त्यामुळे संशयित तरुणीनेच हा संपूर्ण उपद्व्याप करुन बदनामी करत मुलाचे लग्न मोडल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -