घरमहाराष्ट्रनाशिकअपघातांना बसणार आळा; २८ ब्लॅक स्पॉट्सवर गतीरोधक

अपघातांना बसणार आळा; २८ ब्लॅक स्पॉट्सवर गतीरोधक

Subscribe

नाशिक : शहरात ऑक्टोबर महिन्यात मिर्ची चौकात झालेल्या बस दुर्घटनेनंतर ब्लॅक स्पॉट्स अर्थात अपघातप्रवण स्थळांबाबतचा मुद्दा चर्चेत आला. प्रशासनाने तातडीने दुर्घटना झालेल्या चौकात तातडीच्या उपाययोजना राबविल्या मात्र, आता शहरातील इतरही ब्लॅक स्पॉट्सवर गतिरोधक बसविण्याचे आदेश महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरातील २८ ठिकाणी या उपाययोजना केल्या आहे.

ट्रॅफिक सेलच्या बैठकीत मिर्ची हॉटेल चौकातील बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातील विविध अपघातप्रवण स्थळांचे सर्वेक्षण करून ठोस उपाययोजनांबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक लावणे, गतिरोधक टाकणे, तसेच कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

दृश्यमानता महत्वाची असल्याचे सांगून चौकातील सूचना फलक त्यांचे ठिकाण, रंग डिझाईन निश्चित करणे, विविध ठिकाणी वाहतूक नियोजन व पेट्रोलिंगच्या दृष्टीने पोलिस चौक्यांची ठिकाणे, डिझाईन, मिर्ची चौकातील टेम्पलेट याबाबत रेझिलिइन्ट कंपनीच्या तज्ज्ञांनी अहवाल द्यावा. त्यावर त्वरीत काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. रेझिलिइन्ट इंडिया कंपनीचे राजीव चौबे यांनी शास्त्रीय अभ्यास करत १५ दिवसांत अपघातप्रवण स्थळांचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक उपाययोजनासंबंधीचा अहवाल सादर करा, अशाही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय तसेच, राज्य महामार्ग व पालिकेच्या रस्त्यांवर असलेल्या ब्लॅक स्पॉटवर पहिल्या टप्प्यात गतिरोधक बसवले जाणार आहेत.

या ठिकाणी उभारणार गतिरोधक

एबीबी सिग्नल, सकाळ सिग्नल, शरणपूर रोड सिग्नल, वेद मंदिर चौक, बळी महाराज मंदिर, रासबिहारी चौफुली, शिंदे गाव शिवार, द्वारका सर्कल, फेम सिग्नल, राऊ हॉटेल सिग्नल, के. के. वाघ महाविद्यालय चौक, जत्रा हॉटेल चौफुली, उपनगर नाका सिग्नल, चेहेडी गाव फाटा, दत्त मंदिर सिग्नल, पळसे गाव बस थांबा, ट्रक टर्मिनल (आडगाव), तपोवन क्रॉसिंग, स्वामीनारायण चौफुली, जुना गंगापूर नाका, नांदूर नाका, मिरची हॉटेल सिग्नल, तारवाला नगर सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, एक्स लो पॉईंट, एमआयडीसी सातपूर, सिद्धिविनायक चौक, कार्बन नाका, सीबीएस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -