घरक्राइममॉलमध्ये सापडला लाखमोलाचा 'आयफोन', पण त्याने प्रामाणिकपणे केला पोलिसांच्या स्वाधीन

मॉलमध्ये सापडला लाखमोलाचा ‘आयफोन’, पण त्याने प्रामाणिकपणे केला पोलिसांच्या स्वाधीन

Subscribe

पंचवटी : भरस्त्यात सापडलेला महागडा मोबाईल तरुणाने पंचवटी पोलिसांना दिला आहे. या प्रामाणिक तरुणाचे पोलिसांनी कौतुक केले असून, मोबाईलमालकाने पंचवटी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पंचवटीतील गोरक्ष नगर परिसरात राहणारा कार्तिक ताजणे हा मित्रासोबत सिटी सेंटर मॉल परिसरात गेला होता. त्याला मॉलजवळील रस्त्याकडेला अ‍ॅपल कंपनीचा जवळपास दीड लाख रुपये किंमतीचा मोबाईल हॅण्डसेट सापडला. त्याने पोलीस हेल्पलाईन नंबर ११२ वर संपर्क साधला. त्यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे अंमलदार संदीप घुगे यांच्याशी संपर्क झाला. पोलीस अंमलदार घुगे व त्यांचे सहकार्‍यांनी कार्तिक ताजणे यास पंचवटी पोलीस ठाणे येथे घेऊन जात वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे आयफोन १३ प्रो-मोबाईल सुपूर्द केला. कार्तिक ताजणे या युवकाने निवडणूक काळात पोलीस मित्र म्हणून पोलिसांसोबत काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -