घरमहाराष्ट्रनाशिकअन् आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हसू ,,,,,

अन् आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हसू ,,,,,

Subscribe

सोशल नेटवर्किंग फोरम व रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ या संस्थेच्या माध्यमातून पाड्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मखमलाबाद – दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून सोशल नेटवर्किंग फोरम व रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ या संस्थेच्या माध्यमातून आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांच्या संकल्पनेतून या दुर्गम भागातील आदिवासी मुलांना शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या. दरम्यान या मुलांना शालेय वस्तू मिळताच त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले !

सोशल नेटवर्किंग फोरम व रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ या संस्थेच्या माध्यमातून व प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकार्‍यांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षापासून हा आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील सुमारे 1500 मुलांना आतापर्यंत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. नुकताच हा उपक्रम सुरगाणा तालुक्यातील, म्हैसमाळ, सर्कलपाडा, कोटंबी, बाफळून या अतिदुर्गम आदिवासी भागात राबविण्यात आला. यामधे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक भावनेतून स्कूल बॅग, पाणी पिण्यासाठी वॉटर बॅग व वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये व आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी त्याचबरोबर शालेय पटसंख्या वाढावी म्हणुन हा उपक्रम राबवण्यात आला.

- Advertisement -

सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड, रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष महेश गाडेकर, तसेच क्लबचे सर्व सदस्य, नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) चे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, पल्लवी कोठावदे, मोटार वाहन निरीक्षक संदीप निमसे, सचिन बोधले, अनिल केदार यांच्या मदतीने या साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात आपलाही काहीतरी वाटा असावा म्हणून मखमलाबाद येथील ओंकार महाले आणि परिवारानेही मदत केली .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे महेश गाडेकर, प्रमुख पाहुणे म्हणून ओंकार महाले, योगीराज राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ निलेश पाटील, श्रीकांत पवार सर व विजय भरसट सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -