घरक्राइमजळलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

जळलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

Subscribe

इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील घटना; नागरिकांमध्ये घबराट

इगतपुरी : तालुक्यातील आंबेवाडी जवळ एका कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गांवरील वाडीवर्‍हे परिसरातील लष्कराच्या हद्दीत डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याची घटना ताजी असतंनाच मंगळवारी (दि.३०) इगतपुरी तालुक्यात आंबेवाडी येथे एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कारमधील मृतदेह पुरुष की महिलेचा याचा उलगडा अद्यापपावेतो झालेला नाही.

इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. खून करून मृतदेह कारमध्ये ठेवून आग लावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारचे दोन्ही बाजूकडील नंबर प्लेट जळाली आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळास भेट दिली असून, तपास सुरु केला आहे. प्रथमदर्शनी ही घटना खुनाची असल्याचे समोर आले आहे. : सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -