देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड ११ फेब्रुवारीला बरखास्त

pune cantonment board
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चार सदस्य करणार भाजपमध्ये प्रवेश

देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला असून, देवळालीसह पुणे, खडकी, देहूरोड, आदी सहा कॅन्टोन्मेंटचा समावेश आहे. संरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना पाठविले आहे.

देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांची मुदत १० फेब्रुवारी २०१९ रोजी संपली असतांना कायद्यात बदल करुन दोन वेळा सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता,. यामुळे येत्या १० फेब्रुवारीला मुदत संपल्याने संरक्षण विभागाने बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या ११ फेब्रुवारी पासून बोर्ड बरखास्त होणार आहे.