घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा बँकेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

Subscribe

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय कारभाराच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशी सुरु केली असून येत्या 15 दिवसांत अहवाल प्राप्त होणार आहे. बँकेचे प्रशासक अरुण कदम यांच्या कामकाजाबाबत झालेल्या तक्रारीवर विभागीय सहनिबंधकांनी चौकशी पथकांची नेमणूक केली.

प्रशासकीय कामकाजाबाबत भरत गोसावी आणि भाऊसाहेब गडाख यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये थेट सहकार आयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली होती. यात प्रामुख्याने संगणक देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. नियमबाह्य कर्जवाटप, पाच कर्मचार्‍यांना विशेष वेतनश्रेणी लागू करण्यात आली, कर्मचा-यांना थेट पदोन्नत्तीही दिल्या गेल्या अशा तक्रारी अर्जात करण्यात आल्या आहेत. सहकार आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन पुढील आदेश विभागीय सहनिबंधक कार्यालयाला दिले. या पथकाने बँकेत येऊन तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणीस सुरुवात केली आहे.

तक्रारदारांच्या पाच मुद्यांच्या आधारे जिल्हा बँकेची चौकशी सुरु केली आहे. प्रत्येक मुद्याची शहानिशा केली जाईल.15 दिवसांची मुदत असून त्यानंतर अहवाल देण्यात येईल. : राजेंद्र देशमुख, जिल्हा बँक चौकशी समिती अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -