Eco friendly bappa Competition
घर क्राइम विमानात महिलेवर मद्यधुंद व्यक्तीने केली लघुशंका, प्रवासावर कायमस्वरुपी बंदीची शक्यता

विमानात महिलेवर मद्यधुंद व्यक्तीने केली लघुशंका, प्रवासावर कायमस्वरुपी बंदीची शक्यता

Subscribe

एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या लज्जास्पद घटनेनंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तिविरोधात टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहीले.

एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या लज्जास्पद घटनेनंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तिविरोधात टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, संबंधित प्रवाशावर कायस्वरुपी विमान प्रवासाची बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (New York To Delhi Air India Flight Drunk Man Urinated On Woman Sitting In Business Class)

संबंधित महिलेच्या या पत्रानंतर एअर इंडियाने या प्रवाशाची चौकशी सुरू केली आहे. 26 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय या घटनेच्या चौकशीसाठी एअर इंडियाने अंतर्गत समितीही स्थापन केली आहे. तसेच, या प्रवाशाला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची शिफारसही करण्यात आल्याचे सांगितले.

महिलेच्या पत्रात काय लिहिलंय?

- Advertisement -

या घटनेनंतर महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले. “एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 ने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीला जात होती. दुपारच्या जेवणानंतर विमानातील लाइट्स बंद करण्यात आले. दरम्यान, एक मद्यधुंद व्यक्ती सीटजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतरही ती व्यक्ती माझ्या जवळच उभी राहिली. त्यावेळी सहप्रवाशाने समज दिल्यानंतर तो तेथून गेला. परंतु, लघुशंकेमुळे कपडे, बॅग, शूज पूर्णपणे भिजले होते. त्यावेळी क्रू मेंबर्सना याची माहिती दिली. त्यानंतर एअर होस्टेस आली आणि जंतुनाशक फवारणी करून गेली. थोड्या वेळाने त्याला पायजमा आणि डिस्पोजेबल चप्पल देण्यात आली. मात्र, लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली” असे त्या महिलेने पत्रात लिहिले आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या 70 वर्षीय महिलेवर लघुशंका केली. ही घटना २६ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली होती. या लज्जास्पद घटनेनंतर महिलेने विमानातील क्रू मेंबर्सकडे तक्रारही केली. परंतु, त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप त्या महिलेने केला.


- Advertisement -

हेही वाचा – त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला; वाहनांची तोडफोड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -