घरताज्या घडामोडी'मुलगी शिकली प्रगती झाली', रुढी-परंपरांची चौकट मोडत 'Savitribai fule' यांनी स्त्री शिक्षणाचा...

‘मुलगी शिकली प्रगती झाली’, रुढी-परंपरांची चौकट मोडत ‘Savitribai fule’ यांनी स्त्री शिक्षणाचा रचला पाया

Subscribe

एक काळ असा होता की, स्त्रियांचं फक्त चुल आणि मुलं इतकंच आयुष्य चौकटीत बांधलेलं होतं. मात्र, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवून महिलांना चौकटीतून बाहेर काढले. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले आहे.

‘आजची नारी सगळ्यात भारी’ असं आपण ऐकत असतो आणि अशा काही घटना पाहायला मिळतात. कारण आजची स्त्री सक्षम आणि आत्मनिर्भरसुद्धा झाली आहे. ज्यांच्यामुळे ही आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून गगनभरारी घेत आहे.ज्यांच्यामुळे आजची स्त्री सक्षम झाली अशा शिक्षणाचा वसा घेतलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज ३ जानेवारीला जयंती आहे. एक काळ असा होता की, स्त्रियांचं फक्त चुल आणि मुलं इतकंच आयुष्य चौकटीत बांधलेलं होतं. मात्र, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवून महिलांना चौकटीतून बाहेर काढले. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले आहे.त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.

सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी रुढी परंपरापासून त्यांची मुक्तता केली,त्यामुळे आजच्या दिवसाला महिला मुक्तिदिन असे म्हटले जाते. भारतीय सामाज सुधारक महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावत सावित्रीबाई फुले यांनीसुद्धा समाज सुधारणेचे काम केले. त्याकाळी मुलींनी शिकणे म्हणजे मोठे पाप केल्यासारखे समजले जात होते. ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी आपल्या मतावर ठाम राहत स्त्री शिक्षणाचा पाया रचला.

- Advertisement -

अन् ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.

सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सार्‍या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी अ‍ॅन्ड सायंटिफिक सोसायटीने ‘कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली.

- Advertisement -

हेही वाचा – महिला शिक्षणप्रसारक सावित्रीबाई फुले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -