घरमहाराष्ट्रनाशिकडांबरीकरणाची कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा...; आयुक्तांची ठेकेदारांना तंबी

डांबरीकरणाची कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा…; आयुक्तांची ठेकेदारांना तंबी

Subscribe

नाशिक : महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत डांबरीकरणाचे काम करत असलेल्या सर्व ठेकेदारांची बैठक सोमवारी (दि. १४) घेण्यात आली. यात ठेकेदारांना दोष निवारण कालावधीत रस्ते निविदा अटीशर्तीनुसार गुणवत्तापूर्ण काम करण्याचे आदेश देण्यात आले. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्याबाबत सूचनाही देण्यात आली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार सहाही विभागात रस्ते दुरुस्तीची कामे सुरु आहेत. ही कामे उत्कृष्ट दर्जाची असावीत, अशी स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यापूर्वीच अधिकार्‍यांच्या बैठकीत केली आहे. त्याअनुषंगाने ठेकेदारांसोबत झालेल्या बैठकीत महत्वाच्या सूचना देण्यात आल्यात. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील, बांधकाम विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, उप अभियंता बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत कामनिहाय आढावा घेण्यात आला. 30 नोव्हेंबरपूर्वी खड्डे बुजवण्याची तसेच डीएलपी अंतर्गंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी सर्व अभियंत्यांना दिले आहेत.

- Advertisement -

सर्व ठेकेदारांना लिखीत आदेश देऊन जागांची यादी देऊन कामाची गुणवत्ता राखण्याची सुचना करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुण नियंत्रण विभाग आणि बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी डांबर प्लॅन्टला भेट देऊन नमुन्यांची तपासणी केली आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या मंगळवारच्या नाशिक दौर्‍यानिमित्त पश्चिम विभागातील मोडक पॉइंट सिग्नल (पिनॅकल मॉल) चौकात डांबरीकरण करण्यात आले आहे. याच विभागातील रविवार कारंजा जवळ अहिल्याबाई होळकर पूला नजीक रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. तसेच सातपूर विभाग प्रभाग क्रमांक ११ एमआयडीसीतील सिएट पुलावरील रस्ता दुरुस्तीचे काम करून रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. नवीन नाशिक विभागातील अंबड एमआयडीसी मुंगी इंजिनिअरींग कंपनीजवळही रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -