घरमहाराष्ट्रनाशिकआंदोलनांच्या धसक्याने मंडपाची 'स्मार्ट आयडिया'

आंदोलनांच्या धसक्याने मंडपाची ‘स्मार्ट आयडिया’

Subscribe

पावसाचा व्यत्यय टाळून स्मार्ट रोडच्या कामाच्या गतीसाठी ठेकेदाराचे पाऊल, दिरंगाईविरोधात आज मानवी साखळी

स्मार्ट रोडच्या कामातील दिरंगाई आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या मनस्तापाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या राजकीय आंदोलनांचा धसका घेत संबंधित ठेकेदाराने आता पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी थेट मंडप टाकून काम सुरू केले आहे. ठेकेदाराची ही ‘लगीनघाई’ सर्वांसाठीच चर्चेचा विषय बनली आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अशोक स्तंभ ते मेहेर, मेहेर ते सीबीएस आणि सीबीएस ते गडकरी चौक अशा तीन टप्प्यांत स्मार्ट रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, त्यातील एकही टप्पा अद्याप संपूर्ण क्षमतेने पूर्ण झालेला नाही. त्यामुळे दोन वर्षांभरापासून नाशिककरांचे हाल सुरू आहेत. हा संपूर्ण भाग शहरातील मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीचा असतानाही, रस्त्याचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण झालेले नाही. स्मार्ट रोडच्या कामासाठी डिसेंबर २०१८ ची अंतिम मुदत होती. मात्र, त्यानंतरही हे काम पूर्ण न झाल्याने, महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला मुदतवाढ दिली होती. ही मुदत उलटूनही काम न झाल्याने पालिकेने दंडवसुली सुरू केली. तरीदेखील कामाला गती मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिक पुरते त्रस्त झाले आहे.

- Advertisement -

नागरिकांचा वाढता त्रास आणि संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी ठेकेदाराविरोधात आंदोलन छेडले होते. तर, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे हे मानवी साखळीद्वारे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनांचा धसका घेत संबंधित ठेकेदाराने शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) थेट मंडप टाकून स्मार्ट रोडचे काम सुरू ठेवले. पावसामुळे काँक्रिटीकरणाच्या कामाला आणखी दिरंगाई होऊन रोष वाढेल, अशी धास्ती घेत ही शक्कल लढविल्याचे सांगितले जाते आहे.

दिरंगाईविरोधात आज मानवी साखळी

स्मार्ट रोडच्या कामाला दिरंगाई होत असल्याने सर्वसामान्य नाशिककरांसह या रस्त्यावरील व्यापारीवर्गदेखील त्रस्त झाला आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी शनिवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता अशोक स्तंभ येथे मानवी साखळी केली जाणार आहे. काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -