घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी

नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी

Subscribe

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बजरंगवाडीतील एका गर्भवतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा नाशिक शहरातील पहिला मृत्यू झाल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातारण पसरली आहे. या महिलेचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभागही सावध झाले आहे.

असा सापडला कोरोना रुग्ण

नाशिकच्या बजरंगवाडी येथे महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण केले जात असताना २० वर्षांच्या महिलेचा अहवाल सकारात्मक आला. मूळची उत्तर प्रदेश येथील महिला पतीसमवेत नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पथकाने प्रथम आडगावच्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते. पण, महिला दाखल झाली नव्हती. प्रकृती खालावल्यानंतर २ मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाली. नंतर अवघ्या दोन तासांत तिचा मृत्यू झाला. या महिलेची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात येणाऱ्यांचा सध्या शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात पाच नवे रुग्ण

दरम्यान, मंगळवारी प्राप्त अहवालात नाशिकसह सटाणा, सिन्नर, येवला आणि मालेगाव येथील प्रत्येकी एक असे पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. महापालिका क्षेत्रातील एकूण प्राप्त अहवालात ८० पैकी पाच अहवाल सकारात्मक, तर ७५ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. मालेगावमध्ये १४ अहवाल प्राप्त झाले. त्यात १३ नकारात्मक, तर नयापुरा भागातील ७० वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला. जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या ३८३ वर पोहचली आहे. यामध्ये मालेगावमध्ये ३३२, तर नाशिक शहरात १८ आणि ग्रामीण भागातील २७ रुग्णांचा समावेश आहे. मालेगावच्या तुलनेत नाशिकमध्ये फारशी चिंताजनक स्थिती नसल्याचे चित्र आता बदलू लागले आहे.


हेही वाचा – राज्यात अडकलेल्या लोकांना एसटीने घरी सोडणार – विजय वडेट्टीवार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -