घरमहाराष्ट्रनाशिकसांस्कृतिक सचिव पदासाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे

सांस्कृतिक सचिव पदासाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे

Subscribe

सार्वजनिक वाचनालयाच्या संचालक मंडळात बदल होणार; बेणी कोंडीत

सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेतील राजकारणाने पुन्हा डोके वर काढले आहे. नव्या कार्यकारी मंडळाच्या आगामी बैठकीत भाकरी फिरवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे प्रमुख सचिवांच्या विरोधात वातावरण असून, सांस्कृतिक सचिव पद बदलाच्या हालचालींना वेग येऊन या पदावरच गदा आली आहे. प्रमुख सचिव हे पद संस्थेत सर्वांत महत्त्वाचे असून, त्यासाठी आता रस्सीखेच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

‘सावाना’तील कार्यकारी मंडळाची धुसफूस एव्हाना जगजाहीर झाली असून, कार्यक्षम आमदार पुरस्कारावेळी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी धनंजय मुंडे यांना पुरस्कार जाहीर केल्याने धमक्या आल्याचे भर कार्यक्रमात सांगितले होते. त्यावरून कार्यकारी मंडळात उभी फूट पडली आणि ’सावाना’चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर व कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने याबाबत तात्काळ खुलासा करण्यात आला; परंतु हे प्रकरण तेथेच थांबलेले नसून, त्याने आता वेगळे वळण घेतले आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकांवर बैठका होत असून, काही गुप्त खलबतेदेखील होत आहेत. काही पदाधिकारी एका बाजूला झाले असून, आपल्यातीलच एकाला प्रमुख सचिव करावे, असा आग्रह धरला जात असल्याचे ऐकिवात आहे. आता नव्या कार्यकारी मंडळाच्या होणार्‍या बैठकीत प्रमुख सचिव पदावरच गदा येणार असल्याचे सूतोवाच काही पदाधिकार्‍यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -