घरमहाराष्ट्रनाशिकतीन गुन्ह्यांमधील चौघांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई

तीन गुन्ह्यांमधील चौघांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई

Subscribe

तीन गुन्हे करणार्‍या चार जणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. पोलिसांना त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच अपहरण, घरफोडी व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

तीन गुन्हे करणार्‍या चार जणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. पोलिसांना त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच अपहरण, घरफोडी व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. चौघांविरोधात विविध गुन्हे दाखल आल्याने त्यांच्यावर मोक्का अंतगर्त गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

शहारातील प्रमोद महाजन गार्डनजवळ चौघांनी दोन जणांना मारहाण करत एकाचे जीवेठार मारण्यासाठी अपहरण केले. पंचवटीतील मोरे मळ्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी करत चौघांना शिताफीने पकडले. त्यांच्या तावडीतून अपहरण केलेल्याची सुटका केली. दुसर्‍या घटनेत तीनजण ठक्कर बाजार परिसरात चोरीचे विना बिल मोबाईल विक्रीसाठी आल्याचे पोलिसांना समजले. त्यांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली. त्यांनी व्ही.एन.नाईक कॉलेजच्या पार्किंगमधील दुचाकीच्या डिक्कीतून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे, पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगिता नारखेडे, आर.जी.शेळके, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, सुनील जगदाळे, अरूण भोये, सागर हजारी यांनी केली.

- Advertisement -

२४ तासांत गुन्हा उघडकीस

चेतन गुलाबचंद राठी (४४, रा. पार्क अव्हेन्यू, होलाराम कॉलनी) कामानिमित्त २१ मार्च ते ३१ मार्च बाहेरगावी गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी सोमवारी (ता.१) घरातील कपाटातून ५० हजार रुपयांची रोकड, मोबाईल, कॅमेरा, दागिने असा ३ लाख ७ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. चेतन राठी घरी आल्यानंतर त्यांना घरातील साहित्यांची उचकापाचक केल्याचे व दरवाजा तोडल्याचे दिसले. याप्रकरणी राठी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला चौघेजण शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून चौघांच्या मुसक्या आवाळण्यात आल्या. त्याच्या ताब्यातून लॅपटॉप, दोन कॅमेरे, तीन मोबाईल, रोकड असा १ लाख ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -