घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या सिव्हिलमध्ये प्रसुतीसाठी दाखल दोन महिलांचा मृत्यू

नाशिकच्या सिव्हिलमध्ये प्रसुतीसाठी दाखल दोन महिलांचा मृत्यू

Subscribe

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी तीन महिलांपैकी दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, १० एप्रिलला घडली. एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी तीन महिलांपैकी दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, १० एप्रिलला घडली. एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा रुग्णालयात कार्यरत शिकाऊ डॉक्टरांचा महिलांवरील शस्त्रक्रियेत सहभाग असल्यानेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी केला.

माधुरी अंकुश देवरे (२३, रा.चौथी स्कीम, सिडको), रोहिणी सोमनाथ भांडारे (२५, रा. शेंडी, ता. अकोला, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. पहिल्या घटनेत माधुरी देवरे यांना त्यांच्या भावानेसोमवारी (ता.८) दुपारी जिल्हा शासकीय रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले होते. नैसर्गिक प्रसुती होत नसल्याने मंगळवारी (ता.९) सिझेरियनने त्यांची प्रसुती झाली. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत रोहिणी सोमनाथ भांडारे यांना मंगळवारी (ता. ९) सायंकाळी अकोला तालुक्यातील राजूर शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची नैसर्गिक प्रसुती झाली मात्र, अर्भक पोटातच मृत झालेले होते. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी (ता.१०) रात्री पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अतिरक्तस्त्रावाने मृत्यू ओढावल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -