घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकसारा घाटात आयशर पलटला; चालकाचा अंत

कसारा घाटात आयशर पलटला; चालकाचा अंत

Subscribe

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील मुंबईला जाणार्‍या नवीन कसारा घाटात ट्रक क्रमांक एम. एच. १८ बी. सी. ६७८८ या वाहनाने केळी भरलेल्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. ४८ ए. वाय. ४२४५ या वाहनाला धडक दिल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात एक जन ठार झाला असुन एक जण गंभीर जखमी झाला. यावेळी अपघातग्रस्त वाहनातील केळीचा सडा महामार्गावर पडल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा पोलीस व महामार्ग सुरक्षा पोलीसांनी धाव घेऊन काही वेळाने वाहतुक सुरळीत केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २२ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कसारा घाटात केळीने भरलेले आयशर वहान धीम्या गतिने जात असतांना मागुन भरधाव वेगाने एका ट्रकने जोरदार धडक दिली असता आयशर मधील चालक पप्पु यादव हा वाहनाखाली पडुन चिरडला गेला तर त्याचा सहकारी शितल यादव गंभीर जख्मी झाला. जखमींना अपघातातुन बाहेर काढतांना आपत्ती व्यवस्थापन टीमला तब्बल तीन तास अथक प्रयत्न करावे लागले. यात पप्पु यादव हा चालक जागीच ठार झाला तर शितल यादव गंभीर जखमी झाला. अपघात ग्रस्तांना कसारा ग्रामिण रूग्णालयात १०८ रूग्णवाहिकेतुन दाखल केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य प्रकाश शिंदे व देवा वाघ हे तात्काळ नवीन कसारा घाटातील धबधबा पॉईंटवर पोहचले.

- Advertisement -

अपघात भीषण असल्याने १०८ रुग्णवाहिकाला भ्रमणध्वनी द्वारे बोलवून महामार्ग पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, प्रसाद दोरे, जस्सी भाई, बाळू मागे, अक्षय राठोड, विनोद आयरे यांनी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीचा अंधार व पाऊस त्यात वळण रस्ता धोकादायक स्थितीत असतांनाही महामार्ग पोलीस घोटी केंद्रचे सहायक पोलीस निरीक्षक पवार, खाताळे, गोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांच्या मदतीने व खासगी क्रेनच्या मदतीने मदत कार्य सुरु केले. ट्रकने धडक दिल्याने आयशर टेम्पो एका दरडीवर धडकलेला होता. ज्या ट्रकने धडक मारली तो पण पलटी झालेला होता. आयशर टेम्पो मधील जखमी शितल यादव याला अगोदरच प्रकाश शिंदे यांनी बाहेर काढलेले होते. तीन तासाच्या अथक प्रयत्नाने अडकलेल्या जखमी चालक पप्पू यादवला बाहेर काढले. त्याला १०८ रूग्णवाहीकेतील वैद्यकीय अधिकारीने तपासले असता तो मयत असल्याचे सांगितले. या अपघातामुळे रस्त्यावर केळीचा सडा पडल्याने अनेक दुचाकी घसरून पडतांना च्या घटना होतांना दिसत होत्या. या वेळी महामार्ग सुरक्षा पोलीसांनी वाहतुक सुरळीत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -