घरमहाराष्ट्रनाशिकइलेक्ट्रिक बस तशी चांगली; पण ऑन रोड पार्किंगने मारली

इलेक्ट्रिक बस तशी चांगली; पण ऑन रोड पार्किंगने मारली

Subscribe

बहुचर्चित इलेक्ट्रिकल बस चाचणीनिमित्त शहरातील रस्त्यांवरून फिरवण्यात आली खरी; मात्र ऑनरोड पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाल्याने बसचालकाला तारेवरची कसरत करावी लागल्याचा अनुभव शुक्रवारी (ता. १६) अनेकांना आला.

बहुचर्चित इलेक्ट्रिकल बस चाचणीनिमित्त शहरातील रस्त्यांवरून फिरवण्यात आली खरी; मात्र ऑनरोड पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाल्याने बसचालकाला तारेवरची कसरत करावी लागल्याचा अनुभव शुक्रवारी (ता. १६) अनेकांना आला. इतकेच नाही तर वाहतूक बेटांवर तसेच अन्य छोट्या वळवणांवर बस सहजपणे वळवणे चालकाला अडचणीचे ठरत होते. विशेष म्हणजे इलेक्ट्रिकल बस सेवा आणि ऑन रोड पार्किंग हे दोन्ही प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येत आहेत.

शहरात येत्या काही दिवसांत महापालिकेची बससेवा सुरू होणार असून त्यामाध्यमातून इलेक्ट्रिकल बसेसचाही मार्ग मोकळा होणार आहे. या संदर्भात सध्या हैद्राबाद येथे कार्यरत असलेल्या कंपनीची एकमेव निविदा प्राप्त झाल्याने तिला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बसेस शहरातील रस्त्यांसाठी किती व्यवहार्य ठरतील यासंदर्भात शुक्रवारी (ता. १६) तपासणी करण्यात आली. महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता सतीश सोनवणे यांसह अधिकारी उपस्थित होते. पदाधिकार्‍यांनीही बसमध्ये सफारी केली. यावेळी बसच्या गुणांबरोबर अवगुणही लक्षात आल्याचे सांगण्यात आली. बसची लांबी आणि रुंदी अधिक असल्याने वाहतूक बेटांवर वळवताना तसेच यू टर्न घेताना अडचणी येतात. भोसला सर्कलच्या परिसरात बस वळली तेव्हा अन्य वाहनांना थांबून घ्यावे लागले.

- Advertisement -

नियमित शहर बसेसपेक्षा ही बस मोठ्या आकाराची आहे. नाशिकचे रस्ते अरुंद आणि अतिक्रमणबाधित असल्यामुळे ही बस या रस्त्यांवरुन किती सुरळीतपणे चालू शकते याविषयी साशंकता आहे. इतकेच नाही तर ऑनरोड पार्किंग अंतर्गत शहरातील रस्त्यांवर पट्टे मारण्यात आले आहेत. या पट्ट्यांवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद होतात. शुक्रवारी इलेक्ट्रीक बस रस्त्यावरुन फिरत असताना जेथे ऑनरोड पार्किंग आहे तेथे बसचालकाला वेग कमी करावा लागत होता. त्यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडीही निर्माण होत होती. या बसेसला नाशिकमध्ये मुक्तपणे चालवण्यासाठी ऑनरोड पार्किंगची व्यवस्था बंद करावी लागेल असे एका तांत्रिक माहिती असलेल्या अधिकार्‍याने सांगितले.

काय आहेत फायदे

  • एकदा चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकते
  • चार्जिंग चार ते पाच तासांत होईल
  • ताशी ७० किलोमीटरची कमाल वेग मर्यादा
  • बसचे लोकेशन जीपीएसच्या माध्यमातून ऑनलाइन समजेल
  • तापमान तपासणीसाठी बॅटरीला सेंसरची व्यवस्था
  • ३९ प्रवाशी क्षमता
  • स्वयंचलित गिअर
  • वातानुकूलीत यंत्रणा
  • शॉर्ट सर्किट होणार नाही अशी यंत्रणा
  • पावसाळ्यात वीजांपासून संरक्षण होईल अशी व्यवस्था
  • इंजिन नसल्याने हादरे बसणार नाहीत
  • इलेक्ट्रीवर धावणार असल्याने प्रदूषण नाही
  • चालक नियंत्रित हायड्रोलिक दरवाजे
  • प्रशस्त आसनव्यवस्था, आकर्षक रचना
  • सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, अग्निप्रतिबंधक यंत्रणा
  • मोबाईल चार्जिंगची सुविधा
  • पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम
  • थांब्यांची माहिती देणारा डिजिटल बोर्ड
  • इमर्जन्सी स्टॉप बटन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -