घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये वीज अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा संप

नाशिकमध्ये वीज अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा संप

Subscribe

नाशिकमध्ये वीज अभियंते आणि कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला. यावेळी काळी फित बांधून शासनाचा निषेध करण्यात आला.

वीज कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीतर्फे महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण वीज कंपनीतील कर्मचारी अभियंते आणि अधिकार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांकरिता सोमवारी (दि. ७) चोवीस तासाचा लाक्षणिक संप करण्यात आला. यावेळी काळी फित बांधून शासनाचा निषेध करण्यात आला.

‘या’ आहेत मागण्या

महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुर्नरचना संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावे, महापारेषण कंपनीतील स्टाफमध्ये लागू करीत असताना आधीची एकूण मंजूर पदे कमी न करता अंमलात आणावे, शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीकडून राबविण्यात येत असलेले खासगीकरण करण्याचे धोरण थांबवावे, मुंब्रा-कळवा आणि मालेगावचे विभाग खाजगी भांडवलदार कंपनींना देण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवण्यात यावी, निर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेले लघु जलविद्युत निर्मिती शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे आणि समान काम समान वेतन बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करावा या व इतर मागण्यांसाठी २४ तासाचा लाक्षणिक संप केला. या वेळी झोनल उपाध्यक्ष अजय देवरे, विभागीय अध्यक्ष विक्रांत आहेर, राजू आवारे, प्रदीप देवरे, किरण जाधव, विनीत पाटील, कैलास शिवदे, सुनील वाघ, हिरामण पवार, दयाराम सोनवणे, बी. टी. शेवाळे, प्रवीण पवार, प्रदीप भिडे, नागू भामरे, अजय मेतकर, पोपटराव सूर्यवंशी, गौतम अहिरे, गोटीराम सोनवणे आदी अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -