घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकसाठी पर्यटन विकास प्राधिकरण

नाशिकसाठी पर्यटन विकास प्राधिकरण

Subscribe

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे: बोट क्लबवर घेतला पर्यटनविषयक आढावा

नाशिक : जिल्ह्यात अनेक प्रकारचे पर्यटन क्षेत्र आहेत. देशातील व राज्यातील लोकांना धार्मिक पर्यटन सोबत इतर पर्यटनाची माहिती होण्यासाठी नाशिकला पर्यटन जिल्हा बनवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू. तसेच साहसी, धार्मिक व आरोग्य पर्यटनाच्या विकासाबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सांगतानाच नाशिकच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे पर्यावरणव पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

बोट क्लब येथे आयोजित नाशिक जिह्याची पर्यटन विषयक आढावा बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. बैठकीला नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. पर्यटन विभागाचा आढावा घेतल्यानंतर ठाकरे म्हणाले की, पर्यटन विकासाची विविध पर्यटन स्थळांवर काम करताना त्या पर्यटन स्थळाची मालकी ही जलसंपदा, वनविभाग, पुरातत्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक ट्रस्ट यांची असते. त्यामुळे आंतर विभाग समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यटन विकास प्राधिकरण’ निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येईल. त्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढील पन्नास वर्षाचा विचार करून नाशिक जिल्ह्याचा पर्यटनांचा शाश्वत विकासावर भर देण्यात येईल. तसेच इको टुरिझम, धार्मिक पर्यटन व पर्यटन स्थळी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पर्यटन संचालनालय मुंबईचे संचालक मिलिंद बोरीकर, पर्यटन संचालनालय नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी इतर अधिकारी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -