घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफ्लॅटचा ताबा न देता ३० लाख रुपयांची फसवणूक; बिल्डर नरेश कारडांवर गुन्हा...

फ्लॅटचा ताबा न देता ३० लाख रुपयांची फसवणूक; बिल्डर नरेश कारडांवर गुन्हा दाखल

Subscribe

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत फ्लॅटचा ताबा न देता ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर नरेश कारडांसह काही जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारडांवर आत्तापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात तीन आणि मुंबई नाका पोलीस एक गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त कर्नल राकेश कालिया यांच्या फिर्यादीनुसार, कालिया यांनी बिटको महाविद्यालया समोरील हरि नक्षत्र हाऊसिंग प्रोजेक्टच्या फेज 1 मध्ये फ्लॅट बुक केला होता. नरेश जगुमल कारडा, अनुप सुभाषचंद्र कटारिया व इतरांनी बुकिंग केलेल्या फ्लॅटच्या बदल्यात कालिया यांच्याकडून 30 लाख रुपये धनादेशाव्दारे घेऊन त्यांना ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. कारडांनी काही महिने कालिया यांना परतावा दिला. मात्र, त्यानंतर परतावा देण्याचे बंद केले. त्याचबरोबर कालिया यांची गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फ्लॅटचा ताबा ही स्वतः कडेच ठेवून फसवणूक केली. याप्रकरणी कर्नल राकेश कालिया यांनी नरेश कारडा, अनुप कटारिया व इतरांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -