घरमहाराष्ट्रनाशिकगोदाकाठ बनला मद्यपींचा अड्डा; स्वच्छता मोहिमेत जमा झाल्या अडीच क्विंटल दारूच्या बाटल्या

गोदाकाठ बनला मद्यपींचा अड्डा; स्वच्छता मोहिमेत जमा झाल्या अडीच क्विंटल दारूच्या बाटल्या

Subscribe

पंचवटी : नदीकाठी असलेला अंधार, एकांत आणि पोलिसांचा अभाव यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गंगापूर ते रामवाडी यादरम्यानचा गोदाकाठ दारुड्यांचा अड्डा बनला आहे. नाशिक ब्लॉगर्स ग्रुपने संकलित केलेल्या अडीचशे किलो कचर्‍यात सर्वाधिक कचरा हा दारुच्या बाटल्यांचा आहे. त्यामुळेच पवित्र गोदावरीला लागलेले दारुड्यांचे ग्रहण पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेत सोडविण्याची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

नाशिक स्मार्ट सिटी कंपनी, नाशिक महानगरपालिका आणि नाशिक ब्लॉगर्स ग्रुप यांच्या वतीने रविवारी (दि. १३) सकाळी शहीद चित्ते पुलाजवळ (बापू पूल) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी २५० किलो कचरा संकलन करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व दारुच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी वॉकला जाणारे सार्वजनिक आरोग्याबाबत अत्यंत हलगर्जीपणा करत असल्याचेही या मोहिमेतून दिसून आले. त्यात हे नागरिक घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आणून पिशवीसह फेकून असल्याचे चित्र सर्रास बघायला मिळते आहे. तर, दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी अनेक मद्यपी अंधाराचा फायदा घेत ओल्या पार्ट्या करतात व रिकाम्या बाटल्या, ग्लास त्याच ठिकाणी टाकून निघून जात असल्याचे आढळून आले. या सर्व फेकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यातून मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते व त्यामुळे रोगराईला आमंत्रण दिले जाते. त्यामुळे नाशिककरांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती गरजेचे झाले आहे.

- Advertisement -

सध्या भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे गेल्या दोन वर्षांपासून घेतल्या जात असलेल्या इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणाच्या तिसर्‍या पर्वास ९ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण ९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत होणार आहे. या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी https://eol2022.org/citizenfeedback या वेबसाईटला भेट देऊन जवळपास १७ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. नाशिक शहरासाठी ८०२७७६ हा स्थानिक स्वराज्य संस्था कोड देण्यात आलेला आहे. या सिटीझन फिडबॅकमध्ये शहरातील स्वच्छता, आरोग्य सुविधा, रोजगार संधी, उद्यान व मैदान, पादचारी मार्ग, सुरक्षितता अशा देेत असलेल्या सुविधा पुरेशा आहेत किंवा कसे, नागरिकांचे सुविधांप्रती मत याद्वारे भविष्यातील योजना व कार्यपद्धती ठरविण्यास मदत होईल.

२०१८ साली शहराला २१ तर, २०२० साली ३८ क्रमांक मिळाला होता. यंदा नाशिकचा गुणांकन सुधारण्यासाठी अधिकाधिक लोकांनी सर्वेक्षणात सहभागी होणे गरजेचे आहे. याप्रसंगी इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षण मोहीमेबाबतही जनजागृती करण्यात आली. यावेळी स्वच्छता दूत चंद्रशेखर पाटील, स्मार्ट सिटीचे नीलेश बर्डे, नाशिक प्लॉगर्सचे रोहित चौधरी, जुही पाटील, मोहित पाटील, रोशन केदार, मोहित पाटील, आर्या बुवा, समृद्धी दाणी, प्रथमेश बोरसे, स्वामिनी गवळी, सुप्रिया नरवडे आदींनी सहभाग घेतला होता.

- Advertisement -
प्रेमीयुगुलांचाही सुळसुळाट

कचरा संकलनात सर्वाधिक दारू आणि बीअरच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांकडे कमी मनुष्यबळ असल्याने या भागात पेट्रोलिंगचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. त्यामुळेच पुलाजवळील हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने मद्यपींची मोठी वर्दळ असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -