घरक्राइमसिडकोत 'ड्रिंग अँड ड्राइव्ह' करून 'हीट अँड रन'चा थरार; ६ वाहनांना धडक

सिडकोत ‘ड्रिंग अँड ड्राइव्ह’ करून ‘हीट अँड रन’चा थरार; ६ वाहनांना धडक

Subscribe

नवीन नाशिक : मद्यधुंद कारचालकाने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (दि.१३) सायंकाळी उशिरा घडली. यावेळी परिसरातील संतप्त नागरिकांनी कारचालकाला चांगलाच चोप दिला. या घटनेत तीन ते चार व्यक्ती जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल झिप्रु कुवर (वय ५३, रा. इंदिरानगर) हा कारचालक मद्यधुंद अवस्थेत उत्तमनगरकडून अंबड पोलीस ठाण्याकडे जात होता. यादरम्यान त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व त्याने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. या घटनेत सर्व दुचाकीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर ही कार सोमनाथ गायकवाड या फळविक्रेत्याच्या गाडीवर जाऊन आदळली. यात गायकवाड यांच्या पायावरून गाडी गेल्याने त्यांचा पाय फॅक्चर झाला असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, अमोल पाटील यांच्यासह एक लहान मुलगीदेखील जखमी झाली आहे. त्यांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

अचानक झालेल्या या घटनेने परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. सुदैवाने या घटनेत जिवितहानी टळली. संतप्त नागरिकांनी मद्यधुंद गाडीचालकाला बाहेर काढून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, जुन्या नाशिकमधील अमरधाम बाहेर उभ्या असलेल्या सिटीलिंकच्या कर्मचार्‍यांनाही एका कारने धडक दिल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या वाढत्या घटनांमुळे नाकाबंदीची गरज निर्माण झाली आहे.

उत्तमनगरकडून शुभम पार्ककडे प्रवाशी घेऊन जात असताना मद्यपीच्या गाडीने पाठीमागून धडक दिली. यावेळी रिक्षात तीन प्रवासी होते. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. : भाऊसाहेब नेताजी कुंवर, रिक्षाचालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -