घरदीपोत्सवयंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंना टाटा; , खणाच्या आकाशकंदीलांची क्रेझ

यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंना टाटा; , खणाच्या आकाशकंदीलांची क्रेझ

Subscribe

चायनामेड वस्तूंकडे पाठ फिरवत ग्राहकांनी पारंपरिक आकाशकंदिलांकडे वळवला मोर्चा

प्रमोद उगले 

नाशिक : आकार आणि प्रकारांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन आकाशकंदीलचे प्रकार बाजारात दाखल होतात. या वर्षी ग्राहकांनी चायनामेड वस्तूंकडे पाठ फिरवत आपला मोर्चा पारंपरिक आकाशकंदीलकडे वळवला आहे. हंडी कंदील, पर्यावरणपूरक कंदील, खणाचे कंदील, शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारे कंदील यांच्याप्रमाणेच छोट्या आकाराच्या कंदीलांनाही ग्राहकांची मागणी आहे.

- Advertisement -

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटले की आपल्यासमोर चटकन फटाके , पणत्या आकाशकंदील येतात. यंदा बाजारात विविध नावीन्यपूर्ण आकाशकंदील दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी दिवाळीच्या बाजारपेठेत चायनामेड वस्तूंचा बोलबाला दिसून येतो. मात्र यंदा स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देतांना पर्यावरणपुरक आकाशकंदिलांना मागणी आहे.

 त्यात हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहेत. पॉल, मेटॅलिक, रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, साडीचे आणि खणाचे आकाशकंदील यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. महागाईचे सावट दीपावली सजावटीच्या वस्तूंवरही दिसून येत आहे. आकाशकंदीलचे भावही २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत.

- Advertisement -

 बाजारपेठेत ६० रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यत आकाशकंदील उपलब्ध आहेत. टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्यात नाशिकचे कारागीर अग्रेसर असून नाशिक मधून पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येदेखील आकाशकंदीलची निर्यात केली जात असल्याचे त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलतांना सांगितले.

छत्रपतींची प्रतिकृती आकाशकंदील ठरताहेत लक्षवेधी

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेल्या आणि चोळीच्या खणाच्या आकाशकंदीलांना या वर्षी विशेष मागणी दिसून येत आहे. यात विद्युत दिवा लावण्याची विशेष सोय देखील कारागीरांनी केल्याने ग्राहक त्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -