घरताज्या घडामोडीनाशिक पोलिसांना अक्षयकुमारकडून फिटनेस घड्याळ

नाशिक पोलिसांना अक्षयकुमारकडून फिटनेस घड्याळ

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य सुदृढ रहावे, त्यांना शारीरिक क्षमता व स्वास्थ्यची दैनंदिन माहिती समजावी, यासाठी सिनेअभिनेते अक्षयकुमार व दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेडतर्फे फिटनेस घड्याळाचे वाटप शुक्रवारी (दि.१५) पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. फिटनेस घड्याळाव्दारे पोलिसांच्या शारीरिक क्षमता व स्वास्थ्याविषयी माहिती नियंत्रण कक्षाव्दारे संकलित करुन लक्ष ठेवले जाणार आहे. या दोन्ही उद्दिष्ट ठेवून पोलिसांना घड्याळे देण्यात आली आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. दिवसेंदिवस शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनापासून पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण व्हावे, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांना सॅनिटायझर, फेस मास्क, हॅण्डवॉश, जीवनसत्व सी च्या गोळ्या, होमिओपॅथीच्या गोळ्या, ग्लुकॉन डी वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

गोकी फिटनेस घड्याळ्याचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर, सिनेअभिनेते अक्षयकुमार यांनी ५०० घड्याळ व दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड, नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक राजन दातार आणि संचालिका स्नेहा दातार यांनी २ हजार ७०० घड्याळे नाशिक शहर पोलीस दलास दिले आहेत. फिटनेस घड्याळ २२५ पोलीस अधिकारी व ३ हजार ५ कर्मचार्‍यांना दिले जाणार आहे. घड्याळ्याचे प्रातिनिधिक स्वरुपात अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस आयुक्तालयात गोकी मनगटी घड्याळाचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, मनोज करंजे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

असे आहेत घड्याळ्याचे फायदे

आरोग्यविषयक घड्याळामध्ये फिचर्स आहेत. त्याचा पोलिसांना फायदाच होणार आहे. घड्याळामुळे पोलिसांना रक्तदाब, शरीराचे तापमान, किती पाऊले चाललो, व्यायाम, कॅलरीज किती बर्न झाल्या, किती वेळ झोप झाली, याबाबत माहिती मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -