घरमहाराष्ट्रनाशिकपाथर्डी शिवारात शॉटर्सर्किटमुळे घराला आग

पाथर्डी शिवारात शॉटर्सर्किटमुळे घराला आग

Subscribe

माजी नगरसेवक दोंदेंकडून १० हजारांची मदत

इंदिरानगर : पाथर्डी शिवारातील कवठेकर वाडीतील एका घराला आग बुधवारी (दि.२१) लागली. या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांसह अग्निशमन दलाने वर्तविला आहे.

पाथर्डी शिवारातील हॉटेल एक्सप्रेस इन जवळून जाणार्‍या रस्त्यावर कवठेकर वाडी आहे. या ठिकाणी विमल दत्तू मोहिते ही विधवा महिला आपल्या मुलासोबत राहते. बुधवारी (दि २१) सकाळी १० वाजेच्या सुमारास विमल मोहिते यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील फ्रिज, टिव्ही आणि इतरही संसारोपयोगी साहित्य, एका डब्यात ठेवलेले सात हजार रुपये, अन्नधान्य जळून खाक झाले. या आगीची माहिती अग्निशामक दलासह इंदिरानगर पोलिसांना मिळाली असता सिडको विभागातील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रभारी केंद्रप्रमुख आर. ए. लाड, वाहनचालक आय. आ.य काझी, रवींद्र आमले, फायरमन एस. बी. गाडेकर, एस. के. शिंदे यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. याप्रक्रणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

माजी नगरसेवक दोंदेंकडून १० हजारांची मदत

आगीची माहिती समजताच या प्रभागाचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन आगीच्या भक्ष्यस्थानी अडकेल्या महिलेला बाहेर काढण्यासाठी मदत केली. शिवाय, दोंदे यांनी मोहिते कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत करत त्यांना दोन महिने पुरेल इतके किराणा साहित्य उपलब्ध करुन दिले.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -