घरक्राइमदररोज कॉलवर बोल नाही तर, तुझा सोशल मीडियावर हात धरल्याचा फोटो व्हायरल...

दररोज कॉलवर बोल नाही तर, तुझा सोशल मीडियावर हात धरल्याचा फोटो व्हायरल करेन

Subscribe

पाच महिन्यांपासून सातत्याने पाठलाग करून युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी १९ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित तरुणाने तरुणीला दररोज बोलण्यासाठी हात धरल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित युवतीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित अस्लम उर्फ बबलू इकबाल खाटीक (वय १९, रा. दहिवेल, ता. साक्री, जि. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खाटिक हा बहिणीच्या दिराच्या लग्नासाठी जेलरोडच्या मोरे मळा येथे आला. तो पीडित युवतीच्या घराजवळ राहत असून, गेली पाच महिन्यांपासून तो सातत्याने तिचा पाठलाग करायचा. दररोज मोबाईलवर आणि व्हॉट्सअ‍ॅप व्हाईस कॉलवर बोल नाही तर तुझा फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवर तुझा हात धरल्याचा फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देत त्याने पिडीतेचा विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जे.एम. गांगुर्डे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -