घरमहाराष्ट्रनाशिकविटांमध्ये लपवलेला २६ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

विटांमध्ये लपवलेला २६ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Subscribe

सुरगाणा तालुक्यातून २६.७१ लाखांच्या ५७३ बॉक्ससह एकाला अटक

विटांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल २६ लाखांचा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हस्तगत केला. मद्यसाठा पुरवठादार व मद्यसाठा खरेदीदार कोण आहे, याचा विभागाकडून तपास सुरू आहे.

याप्रकरणी पथकाने सुरगाणा तालुक्यातील हतगड येथील सुनील लक्ष्मण खंबायत याला अटक केली. पथकाने त्याच्याकडून मद्यसाठा जप्त केला. निरीक्षक ऋषिकेश फुलझळके, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, एस. एस. रावते, दीपक आव्हाड, गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -