घरमहाराष्ट्रमोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखावी - शरद पवार

मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखावी – शरद पवार

Subscribe

'पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत', असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत दिला आहे.

‘पंतप्रधान हे पद देशाच्या इज्जतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होऊ देणार नाही. परंतु, पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत’, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत दिला आहे.

सत्तेचा होत आहे गैरवापर

‘सत्तेवर आल्यावर सर्व समाजघटकाला न्याय देणं हे तुमचं कर्तव्य होते. परंतु, आज काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर खटला दाखल केला जात आहे. यासाठी तुम्हाला सत्ता दिलीय का? सत्तेचा गैरवापर होत आहे. ठिकठिकाणी आम्ही बघत आहोत विरोधकांवर खटला भरला जात आहे. काँग्रेस पक्षाचा आवाज बंद करायची पावले ते टाकत आहेत’. यावर बोलताना शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत सल्ला दिला आहे.

- Advertisement -

‘३७१ कलमामुळे नागालँड, मेघालय, अरुणाचल, सिक्कीम येथे आपल्याला जमिन घ्यायचा अधिकार नाही. त्यामुळे देशात ३७० किंवा ३७१ हा प्रश्न नाही. तर माझ्या शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते त्यावेळी त्यांनी सत्तेवर आल्यावर कपाशीला ७ हजाराचा भाव देवू’, असे सांगितले होते. पण दिला का? असा सवालही शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

रात्री झोपेतही ३७० बडबडत असतील

‘कपाशीला भाव द्या, बाजरीला भाव द्या, मक्याला भाव द्या म्हटलं तर ३७० सांगितले जाते. नोकरी, बेरोजगारीबाबत बोललो तर ३७० सांगितले जाते. काय करावं या लोकांचं? हे लोक रात्री झोपेतही ३७० बडबडत असतील’, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे. ‘पंतप्रधान आणि अमित शहा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेले की, त्यांच्या तोंडात एकच नाव शरद पवार. काय करावं यांचं सांगा? मी या देशात काय केलं हे देशातील जनतेला माहित आहे’ असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

‘कन्नडची पंचायत समिती आहे त्यात महिला आहेत. त्यांना ५० टक्के आरक्षण कुणी दिले. मंडळ आयोगाचा निर्णय झाला त्यावेळी देशात दंगली झाल्या. परंतु, महाराष्ट्रात तो एकमताने राबवला गेला त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, याची आठवण प्रश्न विचारणा करणार्‍या अमित शहा यांना करुन दिली. आज कन्नड हे राज्यातील सर्वात खराब रस्ते असलेलं शहर म्हणून ओळखलं जात आहे. या भागाचा विकास करण्यासाठी एक अनुभवी व्यक्तीमत्व निवडून येणं गरजेचं आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे ते विभाग न सुधारण्याची त्यांची रणनीती असेल तर त्यांना बाजूला हटवण्याची गरज आहे. आपल्या भागात संतोष कोल्हे अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे विकासाचा दांडगा अनुभव असलेले संतोष कोल्हे यांना संपूर्ण तालुक्याची जबाबदारी देण्याची वेळ आली आहे’, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.


हेही वाचा – ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’; अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -